शाळा बदलीच्या ग्रहणाने शिक्षकांची चिंता वाढली

By admin | Published: May 13, 2017 04:24 AM2017-05-13T04:24:29+5:302017-05-13T04:24:29+5:30

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा बदलीच्या ग्रहणाने प्राथमिक शाळेचे शिक्षक चिंतेत पडले आहेत. त्यानुसार कोणत्या शिक्षकास कोणती

Taking charge of schools has raised concerns among teachers | शाळा बदलीच्या ग्रहणाने शिक्षकांची चिंता वाढली

शाळा बदलीच्या ग्रहणाने शिक्षकांची चिंता वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खोर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा बदलीच्या ग्रहणाने प्राथमिक शाळेचे शिक्षक चिंतेत पडले आहेत. त्यानुसार कोणत्या शिक्षकास कोणती शाळा मिळेल हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे. ९३४ शाळा अवघड क्षेत्रामध्ये दाखविलेल्या असून, त्यापैकी दौंड तालुक्यातील २२ शाळांचा यामध्ये समावेश केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार २७ फेब्रुवारी २0१७ रोजी अवघड क्षेत्र व सर्वसाधरण क्षेत्र धोरण जाहीर केले असून, ४ मे २0१७ रोजी पासून या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना वरवंड केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत कुतवळ म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार खेडेगावामधील जर एखादी शाळा ही दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अवघड असेल, त्याठिकाणी शिक्षकांना शिकविण्यासाठी जाण्यास जर अडचणी येत असतील, तर त्या ठिकाणचे क्षेत्र हे अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी टक्केवारी असल्याने सेवा ज्येष्ठता व्यक्तींची तालुक्यातील तालुक्यात ५ टक्के प्रशासकीय व ५ टक्के विनंती बदलीही होत होती; मात्र ४ मे २0१७ रोजी पासूनच्या धोरणाच्या अंमलबजावणीनुसार निवडीस टक्केवारी नसणार नसून बदल्या जिल्हास्तरीय होतील़

Web Title: Taking charge of schools has raised concerns among teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.