Pune| सोशल मीडियावरुन माहिती काढून उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी

By विवेक भुसे | Published: January 6, 2023 01:03 PM2023-01-06T13:03:16+5:302023-01-06T13:04:16+5:30

उद्योजकाला ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

Taking information from social media, the businessman was asked for a ransom of 30 lakhs | Pune| सोशल मीडियावरुन माहिती काढून उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी

Pune| सोशल मीडियावरुन माहिती काढून उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी

Next

पुणे : सोशल मीडियावर बाहेरगावीच्या सहलीचे फोटो पाहून चोरट्यांनी घरे फोडल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. आता चोरट्यांनी पुढचे पाऊल उचलले असून सोशल मीडियावर टाकलेल्या माहितीच्या आधारे उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर आपल्या मुलांविषयीची टाकलेली माहिती घेऊन एका व्हाईट कॉलर गुन्हेगाराने पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योजकाला ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने किरण रामदास बिरादार (वय २४, रा. मांजरी, पो. आवडकोंडा, ता.उदगीरद्ग) याला अटक केली आहे.

याप्रकरणी मुकुंदनगरमध्ये राहणार्‍या एका ५२ वर्षाच्या उद्योजकाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार बीएस्सी झालेला आहे. तो फेसबुक व इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेतो. ही माहिती मिळाल्यावर त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांचा मुलगा कोलकत्ता येथे शिकायला असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकले होते. त्यावरुन त्याने फिर्यादींना फोन नंबर मिळविला. त्यांना व्हॉटसअप कॉल केला. त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कोलकत्ता येथे असलेल्या मुलाला ठार करुन अशा धमकीचे मेसेज पाठविले. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाला याची माहिती दिली.

पोलिसांच्या सांगण्यानुसार फिर्यादी त्याला पैसे देण्यास तयार झाले. त्यांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या. त्याने डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात पैशांची बॅग ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बॅग ठेवली. पोलिसांनी आजू बाजूला सापळा लावला होता. बॅग घेण्यासाठी तो आल्याबरोबर पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत़.

Web Title: Taking information from social media, the businessman was asked for a ransom of 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.