टाकळी हाजी - कवठे येमाई गटात विकासकामांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:54+5:302021-09-22T04:11:54+5:30
----------- टाकळी हाजी : टाकळी हाजी - कवठे येमाई जिल्हा परिषद गटामध्ये राज्यांचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा ...
-----------
टाकळी हाजी : टाकळी हाजी - कवठे येमाई जिल्हा परिषद गटामध्ये राज्यांचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परीषद सदस्य सुनिता गावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून, नागरिकांनी दर्जेदार कामे करून घ्यावेत, असे आव्हान माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.
तुळशीबाबा नगर ( टाकळी हाजी, ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमामधून नऊ लाख रुपये रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन माजी आमदार पोपटरावजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, प्रगतशील शेतकरी रामदास सोदक, उद्योजक गोरक्षनाथ ईरोळे, पोपट बिबवे, गंगाराम बिबवे, अशोक पोकळे, सागर घोडे, बाबाजी मेचे, हरिभाऊ बिबवे, संभाजी घोडे, उद्योजक संभाजी मदगे पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
गावडे म्हणाले की, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून घोडनदीवर टाकळी हाजी व संगमवाडी पूल तसेच बापुसाहेब गावडे विद्यालय ते कॉलनी ( टाकळी हाजी ) पर्यंत रस्त्यांचे रुंदीकरण कामे मंजूर झाल्याने परिसराच्या वैभवात भर पडणार आहे. शिक्रापूर, मलठण, टाकळी हाजी, सोनेसांगवी ते आमदाबाद, टाकळी हाजी ते वडनेर हे महत्त्वाचे रस्ते मार्गी लागले असून, अनेक लहान रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल मुंबई बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार आहे. उपस्थितांचे स्वागत बाबाजी मेचे यांनी केले. सागर घोडे ,अशोक पोकळे यांनी अाभार मानले.
210921\img_20210921_112112.jpg
टाकळी हाजी (तुळशीबाबा नगर )येथील रस्त्याचे भूमिपूजन करताना माजी आमदार पोपटराव गावडे व ग्रामस्थ