टाकळी हाजीत रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:30+5:302021-07-21T04:09:30+5:30

लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमांतर्गत टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत व ...

Takli Hajit blood donation camp in excitement | टाकळी हाजीत रक्तदान शिबिर उत्साहात

टाकळी हाजीत रक्तदान शिबिर उत्साहात

Next

लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमांतर्गत टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत व धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले . यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक राजेंद्र गावडे, डॉक्टर हिरामण चोरे, माजी मुख्याध्यापक प्रभाकर खोमणे, चेअरमन अशोक माशेरे, उपसरपंच कांतीलाल नरे, सखाराम खामकर, सुभाष गावडे, ग्राम विकास अधिकारी राजेश खराडे, पत्रकार विजय थोरात, प्रवीण गायकवाड, साहेबराव लोखंडे, धोंडीभाऊ जाधव, स्वप्निल गावडे, डॉ. समीर जमादार, डॉ. युवराज बडगुजर, डॉक्टर दीक्षा शिंदे डॉक्टर बालाजी सुरवते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते,राहुल सोदक व सागर गावडे यांनी संयोजन केले यांनी केले.

--

असे आहेत रक्तदाते

संजय बारहाते, सुरेश साबळे, संजय थोरात, मंगेश थोरात, शाकीर शेख, संतोष माशेरे, दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर रसाळ, आबासाहेब घोडे, गणेश घोडे, नवनाथ घोडे, सोमनाथ घोडे, प्रकाश घोडे, प्रशांत डिंगरे, अमोल तांबे, शिवाजी पोकळे, महेश दहिवळ, विनायक गोसावी, गणेश थोरात ,सौरभ रासकर, नितीन थोरात, महेश राठोड, सागर घोडे, अमोल बिबवे, भरत घोडे, सोनभाऊ पवार यांनी रक्तदान केले.

---

फोटो क्रमांक : २० टाकळी हाजी रक्तदान शिबीर

फोटो : टाकळी हाजी ता शिरूर येथे रक्तदान शिबीर प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे रक्तदात्या समवेत ..

Web Title: Takli Hajit blood donation camp in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.