अलंकापुरीत घुमू लागला टाळ-मृदंगाचा नाद
By admin | Published: November 15, 2014 11:48 PM2014-11-15T23:48:21+5:302014-11-15T23:48:21+5:30
ज्ञानेश्वरमहाराजांचा ‘पूर्णावस्था’ म्हणजेच संजीवन समाधी सोहळा येत्या गुरुवारी (दि.2क्) त्रयोदशीला पार पडणार आहे.
Next
भानुदास प:हाड - आळंदी
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव !
दैवताचे नाव सिद्धेश्वर !!
चौ:याऐंशी सिद्धांचा सिद्धबेट !
हा सुखसोहळा काय वर्णु !!
अलंकापुरीत आजपासून संजीवन समाधी सोहळ्याला मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला असून,
ज्ञानेश्वरमहाराजांचा ‘पूर्णावस्था’ म्हणजेच संजीवन समाधी सोहळा येत्या गुरुवारी (दि.2क्) त्रयोदशीला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध गावा-गावांमधून निघालेल्या दिंडय़ा आळंदीत पोहोचू लागल्या आहेत. दिंडय़ांच्या आगमनामुळे अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुटय़ांमध्ये टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागला आहे.
ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास- अर्थात सिद्धबेट अलंकापुरी यात्रेस गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरुवात झाली. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू, विश्वस्त शिवाजीराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते आज सकाळी गुरू हैबतबाबांच्या पायरीची विधिवत महापूजा करून पूजन करण्यात आले. भर पावसात हजारो भाविकांनी दर्शनबारीतून ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनबारीच्या ठिकाणी पावसाचे सावट लक्षात घेऊन, देवस्थानाने पत्र्याचे शेड व ताडपत्री बसवली आहे.
तत्पूर्वी, माउलींची नित्यनियमाप्रमाणो पवमान अभिषेक व दूधआरती करून, महाराजांची आरती करण्यात आली. पूजेनंतर भाविकांना महापूजेसाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी विना मंडपात ह.भ.प. योगीराजमहाराज ठाकूर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. धूपआरतीनंतर विणामंडपात ह.भ.प.
बाबासाहेबमहाराज आचरेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री दहानंतर हैबतबाबांच्या पायरीपुढे वासकरमहाराज, मारुतीबुवा कराडकर, हैबतबाबांचे प्रतिनिधी यांचा जागराचा कार्यक्रम पार पडला. मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. मात्र, रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे आळंदीत दाखल झालेल्या वारक:यांची चांगलीच त्रेधा उडाली.
ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीचा हा आनंददायी सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकरी दिंडी-पालखींसह टाळ-मृदंगाच्या गजरात माउलींचा जयघोष करीत अलंकापुरीत दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पवित्र इंद्रायणीकाठ भाविकांनी गजबजू लागला आहे.
4माउलींच्या 718व्या संजीवन समाधी सोहळ्याला गुरू हैबतबाबा यांच्या पायरीपूजनाने प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, शिवसेना पुणो जिल्हाध्यक्ष राम गावडे, नगरसेवक डी. डी. भोसले, रामभाऊ चोपदार, आनंद जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, प्रभारी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य मान्यवर
उपस्थित होते.
4 चोपदार फाउंडेशनच्या वतीने ह.भ.प. जयसिंगमहाराज मोरे व ह.भ.प. मारुतीमहाराज कोकाटे यांना प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, विश्वस्त शिवाजीराव मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब पवार यांच्या हस्ते गुरू हैबतबाबा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
4पावसामुळे दिवसभरात धर्मशाळा अधिक प्रमाणात गजबजलेल्या दिसत होत्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘माउली ज्ञानेश्वरमहाराज की जय’च्या जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. इंद्रायणी तीरावर महिला वारकरी; तसेच तरुण वारकरी फुगडय़ा खेळण्यात दंग झाले आहेत. बाजारपेठेत तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, खेळणी, पावसापासून बचाव होण्यासाठी प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंची भाविक खरेदी करताना दिसत आहेत. आळंदीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे.
4कार्तिकी यात्रेच्या पाश्र्वभूमीवर येथील ज्ञानेश्वर विद्यालयाला सुटी देण्यात आली आहे. सुटीचा फायदा घेत सहावीत शिकणा:या आकाश सानप या विद्याथ्र्याने भाविकांना गंध लावण्याचे काम हाती घेतले आहे. दिवसभरात त्याला 1क्क् ते 15क् रुपये प्राप्त होत असून, या पैशाचा उपयोग तो वह्या, पुस्तके खरेदी करण्यासाठी करणार आहे. आईवडील मोलमजुरी करीत असल्याने त्यांच्यावर पडणारा आर्थिक भार तो कमी करत आहे.