तीस हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:44+5:302021-07-08T04:09:44+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. तलाठ्याच्या समवेत एका खासगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. तलाठ्याच्या समवेत एका खासगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून यवत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तलाठी नामदेव कुंडलिक केंद्रे (वय ३६ , तलाठी सजा - दहीटणे, ता. दौंड), शंकर दत्तू टुले (रा. मिरवडी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तलाठी केंद्रे व टुले यांनी संगनमत करून तक्रारदार यांचा ७/१२ भोगवटा वर्ग बदलण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोड अंती ३० हजार रुपये ठरविले होते. याबाबत आज (दि.७) रोजी आरोपी तलाठी केंद्रे व खासगी इसम टुले यांनी तलाठी कार्यालयात ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यावर त्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही करवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्र अपर अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. यवत पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.