Pune: राजगुरुनगरमध्ये सातबाराच्या नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, ACB ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:00 IST2024-03-04T18:47:59+5:302024-03-10T15:00:44+5:30

खेड तालुक्यातील महसुल विभागातील सर्वच कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात...

Talathi Circle nabbed for taking bribes for Satbara entries, ACB grins | Pune: राजगुरुनगरमध्ये सातबाराच्या नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, ACB ची कारवाई

Pune: राजगुरुनगरमध्ये सातबाराच्या नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, ACB ची कारवाई

राजगुरूनगर : सातबारावरील नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्यावरून राजगुरुनगरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. 

सोमवारी (दि ३) दुपारी तीन वाजता राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई झाली. तलाठी बबन लंघे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेली सातबारा उताऱ्यावरिल नोंद पुन्हा घालण्यासाठी दोन हजार रुपये तलाठ्याकडे दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, खेड तालुक्यातील महसुल विभागातील सर्वच कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.

Web Title: Talathi Circle nabbed for taking bribes for Satbara entries, ACB grins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.