दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी एकाच ठिकाणी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:41+5:302021-06-16T04:14:41+5:30

-- नीरा : पुरंदर व दौंड तालुक्यातील महसुली कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आपले बस्तान बसविल्याचे ...

Talathis in Daund and Purandar talukas are stationed at the same place | दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी एकाच ठिकाणी ठाण मांडून

दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी एकाच ठिकाणी ठाण मांडून

Next

--

नीरा : पुरंदर व दौंड तालुक्यातील महसुली कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आपले बस्तान बसविल्याचे चित्र आहे. एकाच तालुक्‍यात अनेक वर्षे नोकरीला असल्याने पुरंदर तालुक्यातील महसूल विभागांमध्ये अनेक बरी-वाईट प्रकरणे समोर येत आहेत.

दौंड व पुरंदर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी एकाच तालुक्‍यात कार्यरत असल्याने तलाठ्यांच्या मर्जीप्रमाणे गावाची प्रशासकीय कामे होत आहेत त्यामुळे याच्या बदल्या का होत नाहीत आणि त्यांना कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तलाठ्यांच्या वर्षानुवर्षे बदल्या झाल्या नसल्यामुळे गावातील नागरिकांच्या ओळखी झाल्या असल्याने तेथील एजंटांना सहकार्य करून व मंडलाधिकारी यांंना हाताशी धरून जमिनीच्या खरेदी खताच्या बेकायदेशीर नोंदी मंजूर करण्याचे प्रकार समोर आले आहते.

तलाठ्यांच्या बदलीच्या संदर्भात अनेक वर्षांपासून दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी तालुक्याच्या बाहेर जात नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. आखिल भारतीय ग्राहक हक्क पंचायतीचे उपाध्यक्ष सुदाम खेडेकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सर्व कागदपत्रांची माहिती घेतली असता यामध्ये २० ते २३ वर्षांपासून दौंड येथे तलाठ्यांच्या बदल्या होत नसल्याचे उघड झाले आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव दौंड तहसीलदार यांच्या आस्थापनेवर ४७ व पुरंदर तहसील यांच्या आस्थापनेवर ४२ तलाठी संवर्गातील एकूण ८९ पदे मंजूर आहेत व कार्यरत ८५ तलाठी आहेत. त्यापैकी १५ टक्के बदल्या करण्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पुरंदरमधील २१ तलाठ्यांपैकी ३ तलाठी पात्र ठरविण्यात आले. दौंड तालुक्यातील २६ तलाठी यांच्यापैकी ०३ तलाठी पात्र ठरविण्यात आले. दौंड व पुरंदर मधून ०६ तलाठ्यांच्या बदल्या वर प्रशासनाने आपले शिक्कामोर्तब केले.

१३ जुलै २०२० रोजीच्या माहितीनुसार दौंड व पुरंदरमधील पाच वर्षापेक्षा जास्त कार्यकाळात तालुक्यात असणारे गावकामगार तलाठी कंसात वर्ष व महिने

दौंड तालुक्यातील गाव कामगार तलाठी

सुनील ज्ञानेश्वर शिंदे (२३), शशिकांत आधार सोनवणे(२३), किशोर लक्ष्मण परदेशी(२२), दीपक गणपती पांढरपट्टे (२०) उद्धव कैलास गोसावी (१९-०६), विनायक महादेव भांगे (१९-०६), सुदाम सखाराम मेचकर (१९), संदीप झिंगाडे (१२), जे. एस. भोसले (१०), श्रीमती प्रतिभा रामहरी पवार (९), शंकर आप्पासाहेब दिवेकर (९), प्रशांत चंद्रकांत जगताप (८), श्रीमती योगिता राजेंद्र कदम (८-३), श्रीमती मनीषा महेंद्र कदम (८-३), वर्षाराणी साधू दळवी (८-३), बाप्पू सूर्यमन जाधव (७-११), अर्जुन नागनाथ स्वामी (७-४), पुंडलिक नामदेव कोंंद्रे (७-३), बजरंग केशव सोनवणे (६-५), प्रकाश सोनबा कांबळे(६-५), मिलिंद बळीराम अडसूळ(६-४), हरिभाऊ दत्तात्रय संपकाळ(६-४), बापू राजाराम देवकाते(६), सचिन अंबादास जगताप(६).

पुरंदर तालुक्यातील गाव कामगार तलाठी

संजय सर्जेराव खोमणे (१३ ), बापूसाहेब नामदेव देवकर, (११), दिगंबर कृष्णा वणवे (७), नंदकुमार संपतराव खरात (१०), सोमेश्वर शंकर बनसोडे, (७) मनिषा नारायण भोंगळे (११), निलेश नानाजी पाटील (१२), सुधाकर मारुती गिरमे (११), प्रमोद शंकर झुरुंगे (१०), साईनाथ दामोदर गवळी (८), रूपाली नामदेव शेळके (१०), सुनीता सखदेव वणवे (६), संतोष यशवंत होले (५), नीलेश प्रल्हाद अवसरमोल (७) बाबू विठ्ठल आगे (७), नीलम गोवर्धन कांबळे (६) या तलाठ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

--

गेल्या वर्षीच्या बदल्यात दोन्ही तालुक्याला वेगवेगळा नियम

--

गेल्या वर्षी झालेल्या बदल्यामध्ये पुरंदर मधून महादेव रामचंद्र जरांडे (१३), प्रफुल्ल साहेबराव व्यवहारे (१४), बापूसाहेब दिनकर मोकाशी (१५) व दौंड मधून नीलेश सुभाष गद्रे (४-९), रोहित आशोक गवते (१) बजरंग केशव सोलवनकर (६-५). पुरंदर मधून १३ ते १५ वर्षे कार्यरत असणारे तलाठी यांची दौंड येथे बदली करण्यात आली. परंतु दौंड येथून अवघे १ ते ६ वर्षापर्यंत काम केलेल्या तलाठ्याच्या बदल्या करण्यात आल्या, यामुळे दौंड व पुरंदर यांना कोणते निकष लावले आहेत याची चर्चा गेल्या वर्षी सुरू होत्या.

--

चौकट

एका मोठ्या गावचे मंडलाधिकारी यांनी नुकतीच बेकायदेशीर नोंद मंजूर केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यातच ते त्याच गावचे कायमस्वरूपी रहिवासी असूनदेखील त्यांना त्याच गावात मंडल अधिकारी पदाचा कार्यभार कसा दिला, याची देखील चर्चा सध्या पुरंदर तालुक्यात जोरधरू लागली आहे. त्यामुळे त्या मंडलाधिकारी यांच्यावर प्रशासन आता काय कार्यवाही करणार? याकडे देखील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

--

कोट "नवीन येणाऱ्या शासन निर्णयानुसार बदल्या केल्या जातील. गेल्या वर्षी देखील बदल्या केलेल्या होत्या. यावर्षी देखील बदल्या केल्या जातील."

-प्रमोद गायकवाड,

उपविभागीय आधिकारी, दौंड- पुरंदर

Web Title: Talathis in Daund and Purandar talukas are stationed at the same place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.