तळेगाव ढमढेरे तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:40+5:302021-04-05T04:10:40+5:30
तळेगाव ढमढेरे गावात गेल्या १३ दिवसांत १०० चे वर कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय ...
तळेगाव ढमढेरे गावात गेल्या १३ दिवसांत १०० चे वर कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेऊन ग्रामपंचायतीने गाव बंदचा निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. प्रशासनाच्या नियमानुसार संपूर्ण गाव तीन दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला असल्याचे ग्रामपंचायतीने पत्राद्वारे कळवले आहे. हॉटेल,सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला,फळे विक्री,कापड दुकाने,शेळी- मेंढी बाजार, सोसायटीची कार्यालये,बँका व शाळा तीन दिवस बंद राहणार असून दूध व मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा बंद मधून वगळण्यात आल्या आहेत. दूध व्यवसायाला सकाळी व संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
गावबंदच्या संदर्भात ग्रामपंचायतीने शनिवारी दवंडी देऊन नागरिकांना कळविले आहे. नागरिकांनी मास्क वापरावे, सामाजिक अंतर ठेवावे, गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले असून,विनाकारण फिरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, ग्रामपंचायत, महसूल व आरोग्य विभाग यांनी नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगितले आहे.