तळेगाव ढमढेरेच्या विद्यार्थ्याचा उपग्रह झेपावला अवकाशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:10 AM2021-02-13T04:10:56+5:302021-02-13T04:10:56+5:30

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल ...

Talegaon Dhamdhere student's satellite launched into space | तळेगाव ढमढेरेच्या विद्यार्थ्याचा उपग्रह झेपावला अवकाशात

तळेगाव ढमढेरेच्या विद्यार्थ्याचा उपग्रह झेपावला अवकाशात

Next

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडिया यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च चॅलेंज २०२१ या उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनविण्याच्या विश्वविक्रमात उपग्रह बनविण्याची संधी शिरूर तालुक्यातून तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सोहम सागर पंडित याला मिळाली. शिक्षिका माधुरी शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याहे हा उपग्रह बनवला. दरम्यान, या वेळी वाघोली येथील प्रोडीजी पब्लिक स्कूल या शाळेची ऋतुजा राजेश शेजवळ ही विद्यार्थिनी देखील या उपक्रमात सहभागी झालेली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेले कमी वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमांतर्गत जगातील सर्वांत कमीत कमी वजनाचे २५ ते ८० ग्रॅम वजन असणारे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले.

रामेश्वरम येथे कलाम कुटुंबीय,तेलंगणाचे राज्यपाल तमिळसाई सौंदरा राजन आणि ब्राह्मोस मिसाईल संस्थापक डॉ. ए. पिलाई चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. लिमा रोज मार्टिन व इस्रोचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. मल्लय्य स्वामी अण्णादुराई या मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

कलाम फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या उल्लेखनीय नेतृत्वाखाली देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह अवकाशात सोडले. या वेळी देशभरातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते. आपण तयार केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. या उपक्रमामुळे हवेतील आर्द्रता, हवेतील प्रदूषण, तापमान, हवेतील वायूंचे प्रमाण हवेतील प्रदूषणामुळे ओझोन वायूची होणारी हानी आणि याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तळेगाव ढमढेरे येथील सोहम पंडित सहभागी झालेल्या या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

चौकट:

सोहम याची उपग्रह सोडण्याच्या विक्रमात निवड झाली. परंतु त्या उपक्रमापर्यंत जाण्यासाठी आमच्यासमोर अनेक अडचणी होत्या. मात्र माझे अनेक मित्र आणि शाळेतील शिक्षक यांच्यामुळे आम्हाला यामध्ये सहभागी होता आले.

-सागर पंडित, सोहमचे वडील

फोटो ओळ: तामिळनाडू येथे मान्यवरांच्या समवेत तळेगाव ढमढेरे येथील विद्यार्थी.

Web Title: Talegaon Dhamdhere student's satellite launched into space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.