Pune: ‘त्या’ धातूच्या पाइपची सर्वत्र चर्चा; सुखोईचा महत्त्वाचा भाग, वायुसेनेचे पथक गावात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:08 AM2023-10-18T09:08:13+5:302023-10-18T09:09:18+5:30

मेटल पार्टचा पोलिस प्रशासन व वायुसेना अधिकारी पथकांद्वारे तातडीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

Talk of 'that' metal pipe everywhere; A significant part of the Sukhoi, the Air Force squadron in the village | Pune: ‘त्या’ धातूच्या पाइपची सर्वत्र चर्चा; सुखोईचा महत्त्वाचा भाग, वायुसेनेचे पथक गावात

Pune: ‘त्या’ धातूच्या पाइपची सर्वत्र चर्चा; सुखोईचा महत्त्वाचा भाग, वायुसेनेचे पथक गावात

कवठे येमाई (पुणे) : कवठे येमाई परिसरामध्ये सुखोई विमानाच्या ६० ते ७० फूट लांबीच्या मेटल पार्टचा पोलिस प्रशासन व वायुसेना अधिकारी पथकांद्वारे तातडीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुखोई विमानाचा ६० ते ७० फूट लांबीचा पाइपसदृश्य मेटल पार्ट १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२च्या दरम्यान सराव करताना कवठे येमाई ग्रामपंचायत आणि आसपासच्या परिसरात विमानातून पडल्याची शक्यता आहे. वायुसेनेची दोन पथके तत्काळ कवठे येमाई येथे दाखल झाली असून, या पथकांद्वारे विमानामधून पडलेल्या मेटल पार्टचा शोध सुरू झाला आहे.

कवठे येमाई येथील नागरिकांना दवंडीद्वारेदेखील सूचना करण्यात आली आहे, की लढाऊ विमानाचा हा महत्त्वाचा भाग कुणाला आढळल्यास वायुसेनेला कळविण्यात यावे. यावेळी कवठे येमाई ग्रामस्थ वस्तू शोधण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतील, असे आश्वासन पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे व सरपंच सुनीताताई पोकळे यांनी वायुसेनेच्या शोध पथकाला दिले आहेत. वायुसेनेच्या पथकाने गावामध्ये सर्वत्र पाहणी केली असून, कुठल्याही नुकसानीचे वृत्त नाही.

Web Title: Talk of 'that' metal pipe everywhere; A significant part of the Sukhoi, the Air Force squadron in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.