‘राजगड’ची बोलणी फिसकटली

By admin | Published: April 1, 2015 04:54 AM2015-04-01T04:54:45+5:302015-04-01T04:54:45+5:30

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या,

The talk of 'Rajgad' fell apart | ‘राजगड’ची बोलणी फिसकटली

‘राजगड’ची बोलणी फिसकटली

Next

भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या, तर निवडणूक बिनविरोधची कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपाची बोलणी फिसकटल्याने १० जागांसाठी २५ उमेदवारांचे अर्ज राहिले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी व सेना-भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. ७ जागा बिनविरोध करण्यात आमदार संग्राम थोपटे यशस्वी झाल्याने राजगड कारखाना ताब्यात घेण्यासाठी कॉँग्रेसला फक्त २ जागा निवडून आणाव्या लागणार आहेत.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी विविध गटांत ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी ६४ जणांनी माघार घेतली. तर, ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक लागलेल्या १० जागांसाठी २५ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. निवडणूक लागल्यापासून काँग्रस व राष्ट्रवादी यांच्यात बिनविरोधसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, शेवटच्या दिवशी गटातील जागांच्या वाटपावरून त्यांची बोलणी फिसकटली.

Web Title: The talk of 'Rajgad' fell apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.