सरसकट लसीकरणाच्या गप्पा नंतर मारा, आधी ज्येष्ठांना तरी नीट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:30+5:302021-03-25T04:11:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. मागणी असून देखील महापालिकेने ...

Talk to you soon and keep up the good content | सरसकट लसीकरणाच्या गप्पा नंतर मारा, आधी ज्येष्ठांना तरी नीट द्या

सरसकट लसीकरणाच्या गप्पा नंतर मारा, आधी ज्येष्ठांना तरी नीट द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. मागणी असून देखील महापालिकेने पुरेशा लसी दिल्या नसल्याचा आरोप खाजगी रुग्णालयांनी केला आहे. महापालिकेचा अधिकाऱ्यांचा मते ते रुग्णालयातील लसीची उपलब्धता तसेच त्या रुग्णालयात होणाऱ्या लसीकरणाचा आढावा घेऊनच लसवाटप केले जात आहे.

एकूण लसींचा उपलब्धतेचा प्रश्न अजूनही कायम असल्याने ४५ वर्षांचा पुढचा लोकांचे सरसकट लसीकरण कसे करणार हा प्रश्न विचारला जात आहे.

पुणे महापालिकेचा नारायण पेठेतील मावळे दवाखान्याला ‘लोकमत प्रतिनिधी’ने बुधवारी (दि. २४) सकाळीच भेट दिली. त्यावेळी लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केलेली दिसली. यात तळमजल्यावर लसीकरण करायला आलेले नागरिक होते. वरच्या मजल्यावर लस घेण्यासाठी आलेले रुग्णालयांचे प्रतिनिधी होते. लसीकरणासाठी रांग लागणे तर नेहमीचेच, पण इथे लस घेण्यासाठी देखील रुग्णालयांच्या प्रतिनिधींना रांग लावून उभे राहावे लागत आहे.

अशाच एका प्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले, “मी सकाळी नऊ वाजता येथे आलो आहे. मला क्रमांक मिळाला आहे तो २० च्या पुढचा. साधारण दीड तास थांबल्यावरही अजून मला लसीचा साठा मिळायचा आहे. त्यातच ते किती लसी देतील याची काहीच शाश्वती नाही. सकाळपासून प्रत्येक रुग्णालयाला १० ते १५ व्हायल्सच पुरवल्या जात आहेत.” दुसऱ्या एका प्रतिनिधीच्या मते “आम्ही जवळपास दररोज येथे येत आहोत. पण आम्हाला कधीच पुरेसा साठा दिला जात नाही. जास्त लसीकरण करण्याची क्षमता असताना देखील महापालिका लस देत नसल्याने फेऱ्या मारण्याची वेळ आमच्यावर आली आहे.”

कमी लस का दिली जात आहे? याबाबत विचारले असता महापालिकेचा लसीकरण विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित शहा म्हणाले, “प्रत्येक रुग्णालयाचे नियोजन कसे आहे? त्यांच्याकडे शिल्लक साठा किती आहे? किती लोकांचे लसीकरण त्यांच्याकडून केले जात आहे? या सर्व बाबींचा आढावा घेऊन आम्ही किती लस द्यायची याचे नियोजन करत असतो. हे करताना कोणत्याही रुग्णालयाला परत पाठवावे लागणार नाही याचीही काळजी आम्ही घेत आहोत. साठा उपलब्धतेनुसार नियोजन सुरु आहे. राज्य सरकारचे आदेश आले की त्यानंतर ४५ वर्षांच्या सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करण्याचेही नियोजन केले जाईल.”

चौकट

लसी थोड्या, माणसे फार

महापालिकेच्या आकडेवारीनुसार दोन दिवसांपूर्वी महापालिकेला ५५ हजार लसी मिळाल्या आहेत. या सगळ्या लसी ‘कोव्हिशिल्ड’ आहेत. काहीच दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड उपलब्ध नसल्याने ‘कोवॅक्सिन’चा साठा पुणे महापालिकेला देण्यात आला होता. एकूण ११० केंद्रे आणि उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्याची ही तारेवरची कसरत महापालिका अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. त्यातच जर वय वर्षे ४५ च्या पुढील सर्वांचे सरसकट लसीकरण करायचे तर ते नियोजन कसे करणार, असाही प्रश्न त्यांना पडला आहे.

Web Title: Talk to you soon and keep up the good content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.