‘आरे’तील कार डेपोबाबत आदित्य ठाकरेंशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:23 AM2019-09-16T06:23:43+5:302019-09-16T06:23:50+5:30
‘आरे’तील कार डेपोचा निर्णय झाल्यानंतर तेरा हजार आक्षेप लोकांनी नोंदवले.
पुणे : ‘आरे’तील कार डेपोचा निर्णय झाल्यानंतर तेरा हजार आक्षेप लोकांनी नोंदवले. यातले दहा हजार आक्षेप एकाच वेबसाइटवरून आले. तीही वेबसाइट बंगळुरू येथील होती. हाताने पाठवलेले अर्ज जेमतेम शे-सव्वाशे होते. त्यामुळे ‘आरे’च्या नावाखाली मुंबई मेट्रोला विरोध करणारे कोण आहेत, हे आदित्य ठाकरे यांनी समजावून घेतले पाहिजे. यासंदर्भात मी आदित्य ठाकरेंशी चर्चा करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘आरे’ची जागा वनजमीन नाही. तेथे जैववैविध्याचा प्रश्न नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहूनच काम होणार आहे. त्यानुसार २३ हजार झाडे लावली आहेत. आणखी १२-१३ हजार झाडे लावण्यास सांगितले आहे. तीसुद्धा लावतो आहोत. झाडांची कत्तल आम्हालाही मंजूर नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.