...मेखळी सीमेवर तालुका पोलिसांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:21+5:302021-05-07T04:11:21+5:30
मेखळी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बारामती तालुका संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ...
मेखळी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बारामती तालुका संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामती तालुक्याच्या सर्व सीमांवर नाकाबंदी करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून मेखळी येथील सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
मेखळी हे गाव बारामती तालुका व पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. गावातून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पलीकडे सातारा जिल्ह्याची हद्द आहे. मेखळी गाव पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असून नीरा नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. म्हणूनच या ठिकाणी नाकाबंदी करून अत्यावश्यक वगळता इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनेही कारवाई करण्यात येत आहे. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एम. घाडगे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार नरुटे, कॉन्स्टेबल शेळके, पोलीस पाटील सुभाष भोसले, माजी सैनिक भारत जाधव, माजी सैनिक प्रकाश खोमणे, होमगार्ड नंदू बोडरे, होमगार्ड फुलाजी थोरात हे बंदोबस्ताचे काम पाहत आहेत.
——————————————————
फोटोओळी—बारामती तालुक्याच्या सर्व सीमांवर नाकाबंदी करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
०६०५२०२१ बारामती—०३
———————————————