उतारवयात लसीकरणासाठी ‘तमाशा’; बारामती तालुक्यातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:05+5:302021-05-12T04:10:05+5:30
सांगवी : बारामती शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून रांगेत उभे राहून वयोवृद्ध नागरिकांची लसीअभावी फरफट सुरू आहे. ...
सांगवी : बारामती शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून
रांगेत उभे राहून वयोवृद्ध नागरिकांची लसीअभावी फरफट सुरू आहे. कधीही या लस संपली, असेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वयोवृद्ध महिलेसह अनेक नागरिक संतापून
गेले आहेत. सांगवी आरोग्य केंद्रावर टोकन पद्धत सुरू करून देखील नंबर
आल्यानंतर लसच मिळत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. असाच
अनुभव सांगवी आरोग्य केंद्रावर ३० ते ३५ नागरिकांना टोकन मिळून देखील
माघारी जाताना पाहायला मिळाले. अनेक वयोवृद्ध नागरिकांना उतारवयात लसी
साठी खेटे मारावे लागत आहेत. यामुळे आरोग्य केंद्रात लस न मिळाल्याने
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत एकच गोंधळ केलेला
पाहायला मिळाला.
राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी लसीकरण मोहीम
सुरू करण्यात आली आहे. मात्र, बारामती तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात लस
येत नसल्याने वयोवृद्ध लोकांसह अनेकांना दररोज लसीकरण केंद्रावरून
माघारी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात
आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव
उपाय असला, तरी या लसीचे पाहिजे त्या प्रमाणात जिल्हास्तरावरून लस
तालुक्यातील लसीकरण केंद्रावर येत नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली गेली
आहे. या अगोदर
जेव्हा पुरेशी लस येत होती. तेव्हा नागरिक लसीकरणापासून अलिप्त राहात
होते. सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरण करून घेण्यासाठी
तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी तसेच बारामती
उपजिल्हा रुग्णालयात नागरिक गर्दी करत आहेत. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिक रांगा लावत आहेत. दररोज केवळ ५०
ते १०० लसीच पुरविल्या जात असल्याने अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागत
आहे. त्यातही १८ वर्षांच्या पुढील व्यक्ती वशीलेबाजी करून लसी घेऊ लागले
आहेत. शिवाय हेच महाशय सोशल मीडियावर देखील लस घेतल्याचे चित्र प्रसारित
करत असल्याने, सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. तर टोकन
देऊन देखील बऱ्याच नागरिकांना लसीसाठी नंबर मिळत नसल्याने सध्या सावळा
गोंधळ सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
लस केव्हा येणार, याची शाश्वतीही आरोग्य केंद्रातून दिली जात नसल्याने
नागरिक संध्याकाळपर्यंत लस येण्याची वाट पाहात आरोग्य केंद्रातच ठिय्या
मारून बसलेले दिसून येत आहे. नागरिक रणरणत्या उन्हात तासन्तास उभे
राहतात आणि नंबर आला की लस नाही, म्हणून सांगितले जाते. असा अनुभव
बारामती तालुक्यात केंद्रांवर येत असून नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये
भीती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर आपण लसीकरण करून घेतले पाहिजे, अशी
सर्वांची धरणा झाली आहे.
लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाबाबतचे वेळापत्रकही प्रशासनाने जाहीर केले.
त्यानुसार आज ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. लस मिळण्यासाठी दोन ते अडीच तास
रणरणत्या उन्हात उभे राहून नंबर आला की लस मिळणार नाही, असे केंद्रावर
सांगितले जाते. यामुळे नागरिकांचा राग अनावर होऊन वादविवाद होऊ लागले
आहेत. त्यामुळे केंद्रावर लसीकरणावरून गोंधळ सुरू आहे. यातही बारामतीचे
वरिष्ठ अधिकारी बघ्यांची भूमिका घेत आहेत.
फोटो ओळी : टोकन देऊन ही नंबर न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली..