‘पीवायसी’च्या अध्यक्षपदी ताम्हाणे, लागू सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:44+5:302021-09-02T04:19:44+5:30
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या अध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे तर सचिवपदी सारंग लागू यांची निवड झाली आहे. चंद्रशेखर नानिवडेकर ...
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या अध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे तर सचिवपदी सारंग लागू यांची निवड झाली आहे. चंद्रशेखर नानिवडेकर हे खजिनदार म्हणून काम पाहतील. या त्रैवार्षिक निवडणुकीत ताम्हाणे-भावे गटाने सर्व अकरा जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले.
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ताम्हाणे यांनी क्लबचे विद्यमान सचिव आनंद परांजपे यांचा ८९७ मतांनी पराभव केला. माजी अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे यांच्या जागी आलेल्या ताम्हाणे यांनी २००९ ते २०१८ या काळात क्लबचे सचिव म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेवरही त्यांनी काम केले आहे. सारंग लागू यांची प्रथमच सचिवपदी निवड करण्यात आली असून चंद्रशेखर नानिवडेकर यांची दुसऱ्यांदा खजिनदारपदी निवड झाली आहे.
ऑनलाईन झालेल्या या निवडणुकीनंतर मंगळवारी (दि.३१) झालेल्या क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीचे अध्यक्ष ॲॅड. श्रीपाद खुर्जेकर यांनी २०२१-२४ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. या निवडणुकीसाठी ॲॅड. खुर्जेकर यांच्यासोबत दिलीप संघवी आणि ॲड. गायत्रीदेवी कुलकर्णी यांनी काम पाहिले.
(फोटो जेएमएडीट वर ईमेल केले आहेत.)