पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:27 IST2025-04-09T09:26:16+5:302025-04-09T09:27:18+5:30
एक वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश, ईसीए बेस फायनान्सिंगच्या देशातील पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल
पुणे :पुणे महानगरपालिकेचे वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे. या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला संरक्षण मंत्रालयाने आता ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे महापालिकेच्या वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता. या हॉस्पिटलचे काम सुरू करताना संरक्षण मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड झाेनमध्ये येत असल्याचे समजले. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली. आयुक्त डॉ. भोसले यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामासाठी विशेष सहकार्य केले आहे. या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलँड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे. या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आणि मदर ॲण्ड चाइल्ड केअर यावर भर देण्यात आला आहे.
या हॉस्पिटलमध्ये सुमारे दहा ते वीस टक्के बेड गरजूंसाठी आरक्षित राहणार आहेत. राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना येथे राबविल्या जाणार आहेत. दरवर्षी पालिकेला यामधून ठरावीक उत्पन्न मिळणार आहे. या हॉस्पिटलमध्ये परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीजाय संस्था पालिकेला जवळपास साडेसतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करणार आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.