कदमवाकवस्ती येथे दुभाजकाला धडकून टँकरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:19 PM2018-07-04T21:19:18+5:302018-07-04T21:25:27+5:30

बुधवारी पहाटे कुरकुंभकडून मुंबईला केमिकलचे बॅरल घेऊन निघालेला टँकर टोलनाक्यावरील दुभाजकाला धडकला. अचानक पेटलेल्या टँकरमुळे टोलनाक्यावरील कामगार व इतर सर्वांची धावपळ सुरू झाली.

tanker destroy in fire At Kadamwakvasti | कदमवाकवस्ती येथे दुभाजकाला धडकून टँकरने घेतला पेट

कदमवाकवस्ती येथे दुभाजकाला धडकून टँकरने घेतला पेट

Next
ठळक मुद्देया आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नसून ट्रकचालक किरकोळ जखमी केमिकलच्या स्फोटांमुळे आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद

कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या  रसायन (सॉल्व्हंट) वाहतूक करणाऱ्या टँकरचा बुधवारी (दि. ४) पहाटे चारच्या सुमारास दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघातादरम्यान टँकरने अचानक पेट घेतल्याने भीषण आगीमध्ये टँकर पूर्णत: जळून खाक झाला. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नसून ट्रकचालक किरकोळ भाजला असून ट्रकसह दोन मोटारी, टोलनाक्याचे पत्राशेड व एका टायर दुकानाचे किरकोळ नुकसान झाले. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे कुरकुंभकडून मुंबईला केमिकलचे बॅरल घेऊन निघालेला टँकर टोलनाक्यावरील दुभाजकाला धडकला. अचानक पेटलेल्या टँकरमुळे टोलनाक्यावरील कामगार व इतर सर्वांची धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या हडपसर, कोंढवा तसेच मुख्य केंद्रातली एक अशा ३ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. परिसरात आगीचे मोठमोठे आगीचे लोळ दिसत होते. अग्निशामक दलाच्या २० जवानांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, अधूनमधून होणाऱ्या केमिकलच्या स्फोटांमुळे आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. आग विझविण्यासाठी हडपसर फायर स्टेशनचे अधिकारी शिवाजी चव्हाण, तांडेल तानाजी गायकवाड, जवान कैलास टकले, विलास दडस, संजय जाधव, चंद्रकांत नवले, सचिन आव्हाळे, संदीप कर्ण व कोंढवा फायर स्टेशनचे अधिकारी अनिल गायकवाड, जवान राहुल बांदल, अंबादास दराडे, चंद्रकांत वाघ, सुनील भरेकर आणि देवदूतचे सूरज जवळकर, ठाकरे, लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, गणेश पिंगुवाले व त्यांचे सहकारी, टोलनाका कर्मचारी व स्थानिक रहिवासी राकेश लोंढे यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले. 

Web Title: tanker destroy in fire At Kadamwakvasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.