पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:23 AM2024-04-23T10:23:13+5:302024-04-23T10:25:05+5:30
टँकर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.....
खेड शिवापुर (पुणे) : पुणे- सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) परिसरामध्ये आज २३ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या अपघातामध्ये अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार २३ तारखेला पहाटे तीनच्या सुमारास साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा अल्कोहोलने भरलेला टँकर शिवरे येथे एका वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाला. टँकरमधील अल्कोहोल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांग लागली होती.
पलटी झालेला टँकर काढण्यासाठी महामार्ग पोलीस, टोल नाका प्रशासन त्याचबरोबर अग्निशामक बंब व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत होते. मात्र टँकर काढण्यास वेळ लागत असल्या कारणाने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा#Pune#accidentpic.twitter.com/ERxZprN8pZ
— Lokmat (@lokmat) April 23, 2024