शेतकऱ्यांच्या विहिरीत टँकरने पाणी
By Admin | Published: May 23, 2017 05:26 AM2017-05-23T05:26:51+5:302017-05-23T05:26:51+5:30
गुळुंचवाडी (ता. जुन्नर) व परिसरात विहिरी कोरड्या पडल्या असून शेतकरीवर्ग विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडत आहेत. तसेच शेतातील पिकांनादेखील टँकरद्वारे पाणी देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेल्हा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) व परिसरात विहिरी कोरड्या पडल्या असून शेतकरीवर्ग विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडत आहेत. तसेच शेतातील पिकांनादेखील टँकरद्वारे पाणी देत आहेत.
गुळुंचवाडी व परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. मे महिन्यात जास्त प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या परिसरातील कूपनलिका, विहिरी, पाझर तलाव के. टी. बंधारे कोरडे पडले आहेत. सध्या शेतकरीवर्ग विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडत आहेत. येथील देवकरवस्ती येथील संतू देवकर टँकरद्वारे टँकरला १५०० रुपये देऊन विहिरीत सोडत आहेत. विहिरीत दिवसाआड ६ हजार लिटरचे सुमारे ७ ते ८ टँकर सोडत आहेत. हे पाणी लगेचच दोन दिवसांत तीव्र उष्णतेमुळे झपाट्याने कमी होत आहे. या परिसरातीलमोरही पाणी पिण्यासाठी घराकडे येत आहे. या वर्षी पाणी विकत घेण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. शेतकरीवर्गाची फळांची बाग टँकरद्वारे पाणी देऊन जगविण्याची धडपड सुरू आहे.