‘टणटणी’ खाण्यात आल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:01+5:302021-06-28T04:08:01+5:30

कचरवाडी येथील मृत मेंढ्यांचा रोग : अन्वेषण विभागाकडून केली होती तपासणी बारामती : कचरवाडी -निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे ...

‘Tantani’ being eaten | ‘टणटणी’ खाण्यात आल्याने

‘टणटणी’ खाण्यात आल्याने

Next

कचरवाडी येथील मृत मेंढ्यांचा रोग : अन्वेषण विभागाकडून केली होती तपासणी

बारामती : कचरवाडी -निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे काही दिवसांपूर्वी मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या रोग अन्वेषण विभागाच्या वतीने या मृत मेंढ्यांचे नमुने तपासण्यात आले होते. या मेंढ्यांच्या खाण्यामध्ये घाणेरी (टणटणी) वनस्पती आल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

कचरेवाडी येथील मेंढ्यांच्या मरतुकीबाबत येथील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या रोग अन्वेषण विभागास ई-मेलद्वारे प्राप्त सोमवारी (दि. २१) पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे कचरेवाडी गुलाब पोपट खटके यांच्या मेंढी कळपामध्ये काही मेंढ्या मृत झाल्याचे कळविले होते. त्यानुसार रोग अन्वेषण विभाग येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. मृत मेंढ्यांपैैकी एका मेंढीचे शवविच्छेदन करून विविध रोग नमुने गोळा केले होते. तसेच आजारी मेंढ्यांचे रक्त, रक्तजल, शेण नमुने प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी गोळा करण्यात आले. सदरचे नमुने विविध रोगाच्या चाचण्या करण्यासाठी तपासण्यात आले. विशेषत: मेंढ्यांमधील एचएस, पीपीआर, ईटी या रोगांच्या प्रादुर्भावासाठी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. रोग नमुने निगेटिव्ह आढळून आले. तसेच, भेटीच्या वेळी केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार यकृत व मृत्राशय या अवयवांमध्ये बदल आढळून आले. त्यानुसार नमुन्यांची विषबाधेसाठी तपासणी करण्यात आली. विषबाधा झाल्याचे आढळून आले. तसेच भेटीदरम्यानच्या मेंढपाळाशी झालेल्या चर्चेनुसार मेंढ्यांनी घाणेरी (टणटणी) ही वनस्पती खाण्यात आली असल्याची शक्यता आहे असे सांगितले. सदर वनस्पती खाल्ल्यानंतर मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. बाधित मेंढ्यांमधील विषबाधेचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास सांगण्यात आल्या. अशा प्रकारच्या विषबाधा टाळण्यासाठी मेंढपाळांनी सतर्क राहावे व तातडीने पशुवैद्यकांचा सल्ला घेऊनच योग्य ते औषधोपचार करावे अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

Web Title: ‘Tantani’ being eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.