मिनरल वॉटरच्या बाटल्यात नळाचं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:53 AM2019-04-02T02:53:02+5:302019-04-02T02:53:30+5:30
उन्हाळ्यात आरोग्याशी खेळ : अन्न सुरक्षा विभागाची गुणवत्ता तपासणीची यंत्रणाच नाही
नºहे : नºहे परिसरात ठराविक किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वीस लिटर जारमधील पाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा होणाऱ्या नळातून भरून शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या माथी मारत असल्याचा धक्कादायक प्रकार या परिसरात घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नºहे येथील गावची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे; मात्र येथे ग्रामपंचायतीमार्फत दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे; मात्र विकत घेऊन मिळणारे पिण्याचे पाणी कितपत शुद्ध मिळते, याबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा नºहे परिसरात जोरात सुरू आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे नºहे परिसरात पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत आहे. अनेक नागरिक पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या तसेच हॉटेल, शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्येही वीस लिटर जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत; मात्र सध्या कमी भांडवल व कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले
जाते. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाºया व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प रावबून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते.
नंतर या व्यवसायाने गती घेतली असली, तरी त्यातील शुद्धता मात्र हरवली आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेकडून नळाद्वारे वितरित होणारे पाणीच वीस लिटरच्या जारमध्ये भरून 'मिनरल वॉटर'च्या नावाखाली व्यावसायिक हे जार येथील काही ठराविक किराणा दुकानात विक्रीसाठी पाठवत आहेत. इतर मान्यताप्राप्त कंपनीपेक्षा स्वस्त दरात हे जार किराणा दुकानदारांना मिळत असल्याने दुकानदारही हेच पाणी विक्रीसाठी आपल्या दुकानात ठेवत आहेत; मात्र ते पाणी कितपत शुद्द आहे, त्या पाण्याचा टीडीएस किती आहे हे कोणालाही माहीत नसल्याने नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढून पाण्याच्या जारवर आपल्या कंपनीचे लेबल लावून सर्रास पाणी विक्री करतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा अशी मागणी येथील सुज्ञ नागरिक करीत आहेत.
अशुद्ध पाणीपुरवठा करून आरोग्याशी खेळ
वाघोली : या वर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता कमालीची जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली आहे. परिणामी हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांनी सुरू केला आहे. पाणी शुद्ध केले जाते की नाही, कमी कालावधीत बक्कळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी बाटलीबंद; परंतु अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. उन्हाळ्यात काही विक्रेत्यांकडून बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. काही कंपन्यांचे पाणी 'मिनरलाइझ असते तर काही कंपन्या 'पॅकेज्ड वॉटर’च्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.
या वर्षी पाणपोर्इ$ंची संख्या घटली आहे. त्यामुळे पाणपोई अथवा नळावर जाऊन पाणी पिणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. आता बाटलीबंद पाणी विकत घेणे म्हणजे प्रतिष्ठेचेही लक्षण झाले आहे. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून ते थंड करून 'मिनरल वॉटरच्या नावाखाली विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. यातूनच पाणीविक्रीचा व्यवसाय आता पूर्व हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठया फोफावला आहे. पॅकबंद वस्तूंच्या वेष्टनावर निर्मिती आणि त्या वस्तूच्या उपयुक्ततेचा कालावधी नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे.
संबंधित वस्तू कोणत्या तारखेला उत्पादित झाली, ती किती दिवस टिकणार आहे, अंतिम मुदत कधीची आहे, याबाबत त्या वस्तूच्या वेष्टनावर सर्व बाबी नमूद करणे
संबंधित उत्पादक कंपनीला बंधनकारक आहे; मात्र अनेक कंपन्या पाण्याची बाटलीवर असा उल्लेख करीत नाहीत, असा उल्लेख असला तरी तो अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही, अशा पद्धतीने नमूद केलेले असते. २० लिटर पाण्याचे कॅन घरोघरी जातात.
अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन
१ बाटलीबंद; तसेच कॅनचे पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागही उदासीन दिसत आहे. यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाने पाणी विकणाºयांचा परवाना तपासण्याची गरज आहे. त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणेही आवश्यक आहे.
२ अनेक ठिकाणी बोरमधील पाणी केवळ त्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच थंड करून ते विकले जाते. त्यात कोणते घटक आहे, कोणते घटक नाहीत, याबाबत सामान्य ग्राहकांना माहिती नसते. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याचेच दिसून येत आहे. अशा पाणी प्लँट आणि पाणीविक्रते यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठळक मुद्दे
४बॉटल, पाऊचवर तारीख दिसत नाही...
४अनेक जारमध्ये आढळल्या पाण्यातील अळ्या आणि गुटक्याचे मोकळ्या पुड्या.
४पाणी भरणाºया कामगारांच्या हातात हँड ग्लोज, डोक्यावर कापडी अॅपरण, तोंडाला मास्क अशी कोणत्याही प्रकारची काळजी घेत
नाहीत.
४सर्वसामान्य माणसांनी तक्रार दाखल करायची कोणाकडे ? याची माहिती नाही.
मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन आहेत कारण की, अशा बोगस पाणीविक्री करणाºयांकडून अधिकारी अर्थपूर्ण संबध असल्याची चर्चा आहे. म्हणूनच बोगस पाणी करणाºयांवर कारवाई होत नाही.
- आय. एस. ओ. मानकंन असलेला
पाणी प्लँट, मालक
पाणी थंड करून विकणे यावर आम्ही कारवाई करू शकत नाही, बंद बॉटल विके्रते यांच्या कडून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर अशा पाणीविक्री करणाºयांर कायद्या नुसार कडक कारवाई करण्यात येईल. - संतोष सावंत,
अन्न सुरक्षा अधिकारी , हवेली.