तथागत गौतम बुद्ध जयंती साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:39+5:302021-05-27T04:10:39+5:30

शहरातील सिद्धार्थनगर, चंद्रमणीनगर, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर या ठिकाणी सामुदायिक पूजापाठाचे कार्यक्रम पार पडले. या वेळी बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित ...

Tathagata Gautam Buddha Jayanti simply | तथागत गौतम बुद्ध जयंती साधेपणाने

तथागत गौतम बुद्ध जयंती साधेपणाने

Next

शहरातील सिद्धार्थनगर, चंद्रमणीनगर, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर या ठिकाणी सामुदायिक पूजापाठाचे कार्यक्रम पार पडले. या वेळी बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित असलेला जगातील एकमेव धम्म असल्याचे सांगत बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीमहोत्सव समितीचे गौतम शिंदे, अ‍ॅड. सुशील अहिवळे, प्रा. रमेश मोरे, चेतन शिंदे, कैलास शिंदे, गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे, चंद्रकांत भोसले, शुभम अहिवळे यांनी परिश्रम घेतले.

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक तथागत गौतम बुद्धांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

२६०५२०२१-बारामती-०५

Web Title: Tathagata Gautam Buddha Jayanti simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.