तात्यासाहेबांचे विचार व कार्य कायमच प्रेरणादायी ठरेल- जितेंद्र गुंजाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:18 AM2021-03-04T04:18:52+5:302021-03-04T04:18:52+5:30
शिवनेरीभूषण कै. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सहकुटुंब त्यांच्या कुरण येथील स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी जितेंद्र गुंजाळ ...
शिवनेरीभूषण कै. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सहकुटुंब त्यांच्या कुरण येथील स्मृतिस्थळाला अभिवादन केले.
यावेळी जितेंद्र गुंजाळ बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव विजय गुंजाळ, खजिनदार धर्मेंद्र गुंजाळ सर्व कुटुंबीय तसेच जयहिंद शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ, प्राचार्य योगेश गुंजाळ, प्राचार्य किरण पैठणकर तसेच जयहिंद शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गुंजाळ पुढे म्हणाले की, समाजाची प्रगती व्हायची असेल तर तरुणांना उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मिळायला हवे असा तात्यासाहेबांचा नेहमीच अट्टहास होता. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण मिळाल्यास केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल. कै. तात्यासाहेबांचे विचार व त्यांनी केलेले कार्य हे आम्हा सर्वांसाठी नेहमीच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी उभारलेल्या या कर्तृत्वरूपी वटवृक्षाची जोपासना करून त्यांना अपेक्षित असणारे शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी, त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे उद्गार अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ म्हणाले.
शिवनेरीभूषण कै. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त त्यांनी सहकुटंब त्यांच्या कुरण येथील स्मृतिस्थळाला अभिवादन केले.