करवसुलीचे उद्दिष्ट असफल
By admin | Published: April 2, 2015 05:47 AM2015-04-02T05:47:51+5:302015-04-02T05:47:51+5:30
एलबीटी बंद झाल्याने सर्वाचे लक्ष मिळकतकराकडे होते. करसंकलन विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३९७.५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
पिंपरी : एलबीटी बंद झाल्याने सर्वाचे लक्ष मिळकतकराकडे होते. करसंकलन विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३९७.५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, ४९२ कोटी करवसुलीचे उद्धीष्ठ गाठू शकले नाहीत. सुमारे १०० कोटी थकीत कर राहिला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जास्त मिळकतकराची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. ८२ हजार मिळकत थकबाकीदारांना नागरिकांना या वेळी जप्तीच्या नोटीस पाठविल्या होत्या. एकूण ४ लाख ७ हजार ९२० मिळकती आहेत. सर्वांत जास्त थेरगाव भागातील ७७ कोटी रुपये, सांगवी ४५ कोटी, भोसरी ४२ क ोटी, चिंचवड ३५.९० कोटी, पिंपरी वाघेरे २८ कोटी, तर चिखली २६ कोटी रुपये मिळकतकर वसूल झाली आहे. अवैध बांधकाम शास्तीकर वगळून ३८ हजार ३५८ मिळकतधारकांनी मूळ मिळकतकराचा ७२.९५ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.
३१ मार्च अखेर सर्वाधिक ९.७५ कोटी रुपयांची मिळकत कर वसूल झाला. गतवर्षी ३०७ कोटी मिळकत कराची वसुली झाली होती. मागील वर्षापेक्षा या वर्षी ९०.५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षी एकूण ३,०६,२८२ मिळकतधारकांनी मि़ळकत कराचा भरणा केला आहे. आॅनलाइन गेटवे पेमेंटचा मोठा वापर केला आहे, असे सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ३१ मार्च रोजी कर संकलन विभागाची सर्व कार्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)