मिळकतींच्या वसुलीसाठी ‘कर अदालत’

By admin | Published: December 10, 2014 12:05 AM2014-12-10T00:05:01+5:302014-12-10T00:05:01+5:30

शहरातील थकीत मिळकत कराची वसुली करण्यासाठी महापालिकेकडून आता शहरात कर अदालत घेण्यात येणार आहे.

'Tax court' for recovery of income | मिळकतींच्या वसुलीसाठी ‘कर अदालत’

मिळकतींच्या वसुलीसाठी ‘कर अदालत’

Next
पुणो : शहरातील थकीत मिळकत कराची वसुली करण्यासाठी महापालिकेकडून आता शहरात कर  अदालत घेण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या धर्तीवर ही लोक अदालत असून, तीत मिळकत कराच्या आकारणीपासून करआकारणीसाठी नागरिकांना येणा:या समस्या प्रत्यक्ष जागेवरच सोडविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली. या उपक्रमामुळे मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मदत होणार आहे.
महापालिकेच्या 2क्14-15 अंदाजपत्रकात सुमारे 11क्क् ते 12क्क् कोटी रुपयांची तूट येणार असल्याने महापालिका प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात एलबीटी व बांधकाम विकसनाचे शुल्क घटल्याने महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा दुसरा महत्त्वाचा घटक असलेल्या मिळकत कराच्या थकीत वसुलीकडे पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, शहरातील थकीत कर न भरणा:या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच करासंबधीचे वाद त्यांच्याच ठिकाणी जाऊन सोडविण्यासाठी प्रशासनाकडून लोक अदालत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शहराच्या विविध भागांत करसंकलन विभागाकडून करदात्यांसाठी कर अदालत भरविण्यात येणार असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्या सोडविण्यात येणार आहेत. या ठिकाणी नागरिकांना कर भरण्याची, करआकारणी करण्याची, बिलाच्या नावात बदल करण्याची  या समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही मापारी यांनी स्पष्ट केले. 
(प्रतिनिधी)
 
4या उपक्रमाची सुरुवात प्रशासनाकडून शहरातील समाविष्ट  23 गावांच्या परिसरातून करण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिली कर अदालत उद्या (बुधवारी) धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे होईल. सकाळी 11 ते 3 या वेळेत ही कर अदालत होणार आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर त्यांतील काही गावे वगळण्यात आली, तर काही ठिकाणी गावांची हद्द बदलण्यात आली, तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींच्या नोंदीमध्ये चुका असल्याने मिळकत कराबाबत वाद आहेत. 
 
4या वादावर तोडगा काढण्यासाठी ही लोक अदालत होणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी सिंहगड रस्ता येथील प्रभाग 54 मधील स्थानिक नगरसेवक युगंधरा चाकणकर आणि राजाभाऊ लायगुडे यांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरात हा उपक्रम सुरू करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार, पहिला उपक्रम धायरीपासून सुरू करण्यात येणार आहे.

 

Web Title: 'Tax court' for recovery of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.