शहरातील मराठी शाळांना करमाफी

By admin | Published: February 28, 2015 02:18 AM2015-02-28T02:18:44+5:302015-02-28T02:18:44+5:30

मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी महापालिकेच्या स्थायी सभेत शहरातील मराठी शाळांना मिळकत कर माफी देण्याचा विषय मंजूर करण्यात आला

Taxation of Marathi schools in the city | शहरातील मराठी शाळांना करमाफी

शहरातील मराठी शाळांना करमाफी

Next

पिंपरी : मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी महापालिकेच्या स्थायी सभेत शहरातील मराठी शाळांना मिळकत कर माफी देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. याचा फायदा १२५ शाळांना होणार आहे. त्याशिवाय ६० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूरी देण्यात आली. या मध्ये ऐनवेळीचे एकूण २६ विषय मंजूर करण्यात आले. अतिक्रमणविषयीचा विषय तहकूब क रण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार महेश लांडगे होते. सकाळी अकराला होणारी सभा सायंकाळी सहाला झाली. जिजामाता हॉस्पिटल हा ऐनवेळीचा ३५ कोटीचा विषय मंजूर झाला आहे. पिंपरीत १०० खाटांचे ४ मजल्यांचे हॉस्पिटल होणार
आहे. ९२२२ चौरस मीटरची इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी असणार आहे. या रूग्णालयातून पिंपरीतल्या नागरिकांची सोय होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
तसेच पीएमपीचे ६ कोटी २६ लाख रुपयांचे विषय उपसूचनेनूसार मंजूर झाले. तसेच २० मीनीबस खरेदीचा प्रस्ताव ही मंजूर झाला आहे. यामध्ये १ कोटी रक्कम वाढीव स्वरुपात दिली. तसेच स्वाईन फ्लू करिता टॉमी फ्लू व सिरप औषधे खरेदी करण्यासाठी ५ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले. कासारवाडी येथील एसटी स्टँड ते सीएमई पर्यंत ४०० एमएम व्यासाची पाईपलाईन मंजूर केली. रेनसूट करीता ३ लाख ३४ हजार मंजूर झाले. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेच्या प्रशिक्षणाचे दर निश्चित करण्यात आले. सफाईकामगारासाठी वेतन
करारानूसार लाभार्थीना २००० रुपयापेक्षा जास्त वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Taxation of Marathi schools in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.