पुण्यात कचऱ्यावर लागणार कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:18 AM2018-10-18T01:18:53+5:302018-10-18T01:18:56+5:30

प्रतिमहा १०० ते ५०० रुपयांपर्यंत कचरा कर देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव

Taxes will be required for waste in Pune | पुण्यात कचऱ्यावर लागणार कर

पुण्यात कचऱ्यावर लागणार कर

googlenewsNext

पुणे : शहरात कचºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, शहरातील कचºयाचे शंभर टक्के संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी येणाºया नवीन वर्षात पुणेकरांना कचऱयावर कर द्यावा लागणार आहे. पुणेकरांना आपल्या वार्षिक मिळकत करपात्र रकमेवर किमान १०० ते कमाल ५०० रुपये प्रतिमहा कचरा कर द्यावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव घनकचरा विभागाच्या वतीने स्थायी समिती आणि मुख्य समितीच्या समोर ठेवला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.


पुणे शहराच्या कचºयामध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून, कचरा गोळा करणे, वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कमी पडत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ’ सारख्या खासगी संस्थेची मदत घेऊन कचरा गोळा करण्याचे व वर्गीकरण करण्याचे काम करत आहे. परंतु यामध्ये कोणतीही सुसूत्रता नाही. यामुळे शहरातील अनेक भागातील कचरा उचलला जात नाही, कधी उचलला जातो तर कधी नाही.


महापालिकेला कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दर वर्षी सरासरी ४०० ते ४६० कोटी रुपयांपर्यंत खर्च
येतो. परंतु, नागरिकांकडून यासाठी मिळणारे पैसे पन्नास टक्केदेखील नाही. खर्च आणि उत्पन्नातील मोठी तुट भरून काढण्यासाठी व शहरात निर्माण होणाºया कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नवीन वर्षापासून पुणेकराकडून कचºयावर कर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.

Web Title: Taxes will be required for waste in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.