शेतीसाठीचे ‘ते’ ६ टीएमसी यंदा अशक्यच
By admin | Published: April 10, 2015 05:36 AM2015-04-10T05:36:55+5:302015-04-10T05:37:33+5:30
शहरात निर्माण होणारे सांडपाणी मुंढवा येथे बंधारा बांधून जॅकवेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.
पुणे : शहरात निर्माण होणारे सांडपाणी मुंढवा येथे बंधारा बांधून जॅकवेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. त्या बदल्यात महापालिकेस पाटबंधारे विभागाकडून साडेसहा टीएमसी जादा पाणी देण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामागील शुक्लकाष्ठ अद्यापही सुरूच असून, आधी रेल्वेने, नंतर पाटबंधारे विभागाचे काम रखडल्याने तर आता एक शेतकरी न्यायायलात गेल्याने हा प्रकल्प आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन महिने हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडे ाहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तब्बल १00 कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मार्च अखेरीस पूर्ण होणार होता. त्यानुसार, एक एप्रिलला पहिले पाणी देण्याच्या घोषणाही करण्यात आल्या होत्या. मात्र, हे पाणी सोडण्यात येणारा जुना कालवा (बेबी कॅनॉल ) दुरुस्तीसाठीचे काम अद्याप संपलेले नाही. तसेच मुंढवा जॅकवेल ते हडपसर येथील साडेसतरा नळीपर्यंत टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनेचे कामही अद्याप पूर्ण झालेली नाही. या शिवाय रेल्वे क्रॉसिंगखाली जलवाहिनी टाकण्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे किमान या वर्षी तरी हे पाणी मिळणे शक्य नाही.