रुग्णाच्या नातेवाईकांसाठी चहा, नाष्ट्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:12+5:302021-05-23T04:10:12+5:30
बारामती तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिल्व्हर ज्युबली बारामती या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातून लांबून रुग्ण येत ...
बारामती तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिल्व्हर ज्युबली बारामती या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातून लांबून रुग्ण येत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांना औषधोपचाराच्या गोळ्या देण्यासाठी किंवा कोरोनाबाधित रूग्णांना दाखल करणे व सोडण्यावेळी नातेवाईक हे रूग्णालय परिसरातच थांबत आहेत. शहरात सध्या लॉकडाउन असल्यामुळे त्या सर्वांचे घरून डबा घेऊन येईपर्यंत उपासमार होत असल्याचे लक्षात येताच कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत सामाजिक दृष्टिकोनातून स्वर्गीय धनंजयभाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने नगरसेवक जयसिंग (बबलू) देशमुख यांच्या माध्यमातून सिल्व्हर ज्युबली येथे ही नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.
महामारीत सर्वसामान्यांना आधार देण्याचा निश्चय ट्रस्टने केला आहे. घरून डबा घेऊन येईपर्यंत अनेक रूग्णाची व नातेवाईकांना उपासमारीपासून दिलासा मिळाला आहे. आत्तापर्यंत जवळपास १० हजारहून अधिक रूग्णांसह नातेवाईकांची स्वर्गीय धनंजयभाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट आणि नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्या पुढाकारातून रुग्णांची चहा-नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली असून पुढेदेखील अशाप्रकारे नाष्ट्याची सोय चालूच राहणार असल्याचे नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले.
लॉकडाऊनमुळे सकाळ-सकाळी अनेक आस्थापना बंद असून हॉटेल बंद असल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना वेळेवर चहा-नाष्टा उपलब्ध होत नाही. या अडचणी लक्षात येताच आम्ही सामजिक बांधिलकी जपत रुग्णांची व नातेवाईकांची चहा-नाष्ट्याची सोय केली आहे.
- जयसिंग देशमुख
नगरसेवक, बारामती नगरपरिषद, बारामती
स्वर्गीय धनंजयभाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने चहा-नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.
२२०५२०२१-बारामती-०१