शिक्षक कोरोना लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:46+5:302021-03-14T04:11:46+5:30
शासनाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर पासून इ. ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. गेल्या २७ ...
शासनाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर पासून इ. ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. गेल्या २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोविड जन्य परिस्थितीत तारेवरची कसरत करत शिक्षकांनी शाळा सुरू ठेवल्या, विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली, पालक विद्यार्थ्यांशी सततचा संपर्क ठेवला आहे. आता येत्या २३ एप्रिलला १२ वीच्या आणि २९ एप्रिलला १० वीच्या परीक्षा सुरू होणार असून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्यापही शासनाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे कोविड लसीकरणाबाबत दुर्लक्ष केले आहे.
या संदर्भात शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे म्हणाले, शिरूर तालुक्यात ९ ठिकाणी शासकीय कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहेत. शिक्षकांच्या लसीकरणाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरीत केली जाईल. कोणीही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल.