‘राईट टू रीड’पासून शिक्षकच अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:47+5:302021-05-11T04:10:47+5:30

पुणे : राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्य व आकलन वाढविण्यासाठी शासनातर्फे ‘राईट टू रीड’ हा प्रकल्प हाती ...

The teacher is ignorant of ‘right to read’ | ‘राईट टू रीड’पासून शिक्षकच अनभिज्ञ

‘राईट टू रीड’पासून शिक्षकच अनभिज्ञ

Next

पुणे : राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्य व आकलन वाढविण्यासाठी शासनातर्फे ‘राईट टू रीड’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी राज्यातील १५ हजार २७५ शाळांना ‘राईट टू रीड’ या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस दिला. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंग्रजी विषयाचे शिक्षक यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हा उपक्रम नेमका कुठे राबविला जातोय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य शासन व आयएल ॲण्ड एज्युकेशन व इंग्लिश हेल्पर या संस्थेबरोबर हा प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२०-२१ पर्यंत राज्यातील ६५ हजार शाळांना ‘रीड टू मी’ या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस देण्याचे निश्चित केले. त्यात पहिल्या टप्प्यात १५ हजार २७५ शाळांना हा ॲक्सेस दिला. तर दुसऱ्या टप्प्यात ९ हजार १५४ शाळांना ॲक्सेस दिला जाणार आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इंग्रजी पाठ्यपुस्तकांमधील मजकूर दिला आहे. त्यांचे वाचन संगणकाद्वारे केले जाते. वाचनाची गती आवश्यकतेनुसार कमी अधिक करण्याची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये आहे. सॉफ्टवेअरमधील विविध सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द व त्यांचा उच्चार यांची सांगड सोयीचे होते. या सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांचे वाचन रेकॉर्ड करण्याची सुविधा असून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वाचनातील प्रगतीचा आढावा घेता येऊ शकतो.

राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल अचिव्हमेंट सर्वे तसेच ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या दोन्ही संस्थांच्या सर्वेक्षणात वाचन व आकलन यांची चाचणी होते. या दोन्ही सर्वेक्षणात राज्यांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी ‘रीड टू मी’ या सॉफ्टवेअरची मदत होऊ शकते. त्यामुळेच शासनातर्फे ‘राईट टू रीड’ हा प्रकल्प हाती घेतला. परंतु, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येत आहे.

--

शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील १ हजार ९०२ शाळांना ‘रीड टू मी’ सॉफ्टवेअरचा ॲक्सेस देण्यात आला आहे. परंतु, जिल्ह्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

--

‘रीड टू मी’ सॉफ्टवेअरचा ॲक्सेस दिलेल्या शाळांची जिल्हानिहाय संख्या

अहमदनगर-१५९६, अकोला-१८८, अमरावती-४४९, औरंगाबाद-४६३, बीड-४७२, भंडारा-१९८, बुलढाणा-९७६, चंद्रपूर-१,००७, धुळे-६४०, गडचिरोली-४६३, गोंदिया-७६०, हिंगोली-४०४, जळगाव-६५४, जालना-२४०, कोल्हापूर-७४२, लातूर-५५२, मुंबई-५९३, नागपूर-३६२ नांदेड-४९०, नंदुरबार-६१७, नाशिक-६१२, उस्मानाबाद-९७६, पालघर-१,६६० परभणी-४३७, पुणे-१,९०२, रायगड-७२८, रत्नागिरी-६७०, सांगली-७७५, सातारा-७२७, सिंधुदुर्ग- १०००, सोलापूर-६२३, ठाणे- ६९८, वर्धा-५९२, वाशीम-४७१, यवतमाळ-७५८.

Web Title: The teacher is ignorant of ‘right to read’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.