Pune: शिक्षकाने विद्यार्थिनीचा भर क्लासमध्ये केला विनयभंग; नवले पूल परिसरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:16 PM2023-09-23T12:16:21+5:302023-09-23T12:17:00+5:30

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Teacher molested female student in class; Type in Navale Pool area | Pune: शिक्षकाने विद्यार्थिनीचा भर क्लासमध्ये केला विनयभंग; नवले पूल परिसरातील प्रकार

Pune: शिक्षकाने विद्यार्थिनीचा भर क्लासमध्ये केला विनयभंग; नवले पूल परिसरातील प्रकार

googlenewsNext

धायरी (पुणे) : शिक्षकाने विद्यार्थिनीचा भर क्लासमध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नवले पूल परिसरात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नरेंद्र जुवेकर (वय ५५) या शिक्षकाविरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवले पुलाजवळ फुल स्टॉप डेव्हलपर्स या खासगी कोचिंग क्लासमध्ये कम्युनिकेशन क्लासचे नरेंद्र जुवेकर हे तक्रारदार यांच्या कपड्यांवर काहीतरी बोलून, तसेच कपड्यांवरील नाव मोठ्याने क्लासमध्ये घेऊन तक्रारदार विद्यार्थिनीला मनस्ताप दिला, तसेच तक्रारदार यांच्या व्हॉट्सॲपचे स्टेटस पाहून चालू क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर म्हणाला की, “क्या बुढो के साथ होली खेल रहे हो, मैं तो गोवा जाकर होली खेल रहा था! मेरी दस उंगलीया घी में थी और मेरे चारो बाजू लडकियां थी,” असे मोठ्याने शब्दोच्चार करून, तक्रारदार विद्यार्थिनीचा विनयभंग केला. नरेंद्र जुवेकर या शिक्षकाने विद्यार्थिनीला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने तिने घातलेल्या टॉपवरचे शब्द भर क्लासमध्ये उच्चारत तिचा मानसिक छळ केला.

त्यानंतर, त्याच विद्यार्थिनीने ठेवलेला होळीचा व्हॉट्सॲप स्टेटस पाहून भर क्लासमध्ये अश्लील वक्तव्य करत विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याबाबत पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे करीत आहेत.

Web Title: Teacher molested female student in class; Type in Navale Pool area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.