PMC: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये होणार २६० पदांसाठी शिक्षक भरती

By राजू हिंगे | Published: June 8, 2023 03:51 PM2023-06-08T15:51:33+5:302023-06-08T15:52:27+5:30

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...

Teacher recruitment for 260 posts in Pune Municipal Schools pmc latest news | PMC: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये होणार २६० पदांसाठी शिक्षक भरती

PMC: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये होणार २६० पदांसाठी शिक्षक भरती

googlenewsNext

पुणे :पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या इंग्रजी शाळांमध्ये २६० पदांसाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर उमेदवार घेण्यात येणार आहेत. महापालिकेकडून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे महापालिका संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी २०२३-२४ यासाठी तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन वीस हजार रुपये वर शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते २ या वेळेपर्यंत अर्ज शिक्षण विभाग (प्राथमिक), कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, शिवाजीनगर येथे सादर करावेत. यापदासाठीच्या अर्जाचा नमुना व जाहिरात https://www.pmc.gov.in/en/recruitments या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Web Title: Teacher recruitment for 260 posts in Pune Municipal Schools pmc latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.