शिक्षकांनी माणसांतला माणूस निर्माण करावा : डॉ. सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:33 PM2018-09-30T23:33:17+5:302018-09-30T23:33:29+5:30
यावेळी शिरूर तालक्यात ग्रामीण भागात तळागाळातील गोरगरीब मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रसंगी पदरमोड करून शिक्षण संस्थांची दालने सुरू करणाऱ्या निमगाव म्हाळुंगी
रांजणगाव गणपती : ‘‘शिक्षण संस्थेच्या यशामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असून शैक्षणिक अध्यापनाबरोबरच येथून पुढे शिक्षकांनी माणसांतला माणूस निर्माण करण्याचे काम करावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
शिरूर तालुका माध्यमिक संघ आयोजित स्व. रसिकलाल धारीवाल विशेष सन्मान पुरस्कार व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. सप्तर्षी बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, उद्योजक प्रकाश धारीवाल, सदाशिव पवार, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिरूर पं. स. सभापती विश्वास कोहकडे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, जि. प. सदस्या सविता बगाटे, पांडुरंग थोरात, राजेंद्र गावडे, महेश ढमढेरे, कांतिलाल गवारे, रवींद्र ढोबळे, माध्यमिक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, जिल्हा प्रतिनिधी धर्मेंद्र देशमुख, तालुकाध्यक्ष अशोक दरेकर, उपाध्यक्ष गणेश मांढरे, सचिव संदीप सरोदे, तसेच संघाचे पदाधिकारी, पुरस्कारप्राप्त संस्थाचालक, शिक्षक उपस्थित होेते.
यावेळी शिरूर तालक्यात ग्रामीण भागात तळागाळातील गोरगरीब मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रसंगी पदरमोड करून शिक्षण संस्थांची दालने सुरू करणाऱ्या निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्री म्हसोबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी आमदार पोपटराव गावडे, रंगनाथ हरगुडे, रवींद्र धनक व कांतिलाल शेलार या ५ संस्थाचालकांचा स्व. रसिकलाल धारीवाल विशेष सन्मान पुरस्कार व एकूण १८ गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन डॉ. सप्तर्षी यांच्या हस्ते गौरविण्यात