शिक्षक सक्षमीकरण ऑनलाईन स्पर्धांमध्ये शिक्षकांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:35+5:302021-03-25T04:10:35+5:30

कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.परंतु प्राथमिक शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खेड पंचायत समितीच्या शिक्षण ...

Teacher success in teacher empowerment online competitions | शिक्षक सक्षमीकरण ऑनलाईन स्पर्धांमध्ये शिक्षकांचे यश

शिक्षक सक्षमीकरण ऑनलाईन स्पर्धांमध्ये शिक्षकांचे यश

Next

कोरोनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.परंतु प्राथमिक शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध विषयांच्या शिक्षक सक्षमीकरण ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो प्राथमिक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.

पंचायत समिती खेड सभापती भगवान पोखरकर उपसभापती चांगदेव शिवेकर, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्ताराधिकारी जीवन कोकणे, बाळकृष्ण कळमकर यांनी सर्व यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले.

स्पर्धेत वैयक्तिक गीत गायन - विजय सुरकुले, बडबड गीत गायन - नारायण करपे, स्वलिखित कविता गायन - शैला जांभळकर,

वक्तृत्व स्पर्धेत - मंगल कातळे, रांगोळी - रुपाली परदेशी, फलक लेखन - गणेश सुतार, सुंदर हस्ताक्षर - काळुराम डावरे, चित्रकला - महेश कोबल, मधुकर छत्रीकर, घोषवाक्य - ज्ञानेश्‍वर दुंडे ,पुस्तक सक्षमीकरण - छाया गावडे, कथाकथन - नारायण करपे, मी राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम - हरीश हजारे, स्वरचित कविता लेखन ; ज्ञानेश्वर दुंडे.

वस्तूपासून कलाकृती - यास्मिन फातिमा, भेट दिलेल्या किल्ल्याबाबत अनुभवलेखन - अश्विनी वाडेकर, किल्ला अनुभवकथन स्पर्धा - प्रगती कड, निबंध लेखन - रूपाली परदेशी या सर्व स्पर्धकांनी स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवले.तर १०६ शिक्षकांनी द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.

Web Title: Teacher success in teacher empowerment online competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.