Pune: शिक्षक घरी यायचा अन् अत्याचार करायचा! १४ वर्षांच्या मुलीची पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:33 PM2023-08-14T14:33:36+5:302023-08-14T14:35:05+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

teacher used to come home and abuse! A 14-year-old girl filed a complaint with the police | Pune: शिक्षक घरी यायचा अन् अत्याचार करायचा! १४ वर्षांच्या मुलीची पोलिसांत तक्रार

Pune: शिक्षक घरी यायचा अन् अत्याचार करायचा! १४ वर्षांच्या मुलीची पोलिसांत तक्रार

googlenewsNext

पुणे : घरी शिकवणी घेण्यासाठी येणाऱ्या शिक्षकानेच १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका १४ वर्षांच्या मुलीने मुंढवापोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अलोक सर (रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार घोरपडीत एप्रिल २०२३ मध्ये घडला होता. अधिक माहितीनुसार, अलोक हा ३५ ते ४० वर्षांचा शिक्षक फिर्यादी यांना शिकवण्यासाठी घरी येत होता. फिर्यादी घरी एकटी असता गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. कोणाला काही सांगितले तर लहान भावाला मारून टाकण्याची धमकी दिली.

त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली, हे समजल्यावर तिने शिक्षकानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सत्तार तपास करीत आहेत.

Web Title: teacher used to come home and abuse! A 14-year-old girl filed a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.