शिक्षक आत्महत्या ; सखोल चौकशी करा

By admin | Published: April 28, 2017 05:43 AM2017-04-28T05:43:48+5:302017-04-28T05:43:48+5:30

वाघोली शाळा क्रमांक १ मधील शिक्षक जीवन वाघमारे यांनी २४ एप्रिल रोजी आत्महत्या केली. या प्रकाराची सखोल चौकशी करून

Teachers commit suicide; Make an in-depth inquiry | शिक्षक आत्महत्या ; सखोल चौकशी करा

शिक्षक आत्महत्या ; सखोल चौकशी करा

Next

पुणे : वाघोली शाळा क्रमांक १ मधील शिक्षक जीवन वाघमारे यांनी २४ एप्रिल रोजी आत्महत्या केली. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
वाघोलीतील खासगी शाळेच्या तपासणी करीत असताना झालेल्या वादामुळे व भांडणामुळे संबंधित केंद्रप्रमुख व अन्य ५ शिक्षक यांनी पोलीस ठाण्यामध्ये खासगी शाळेच्या प्रशासनाविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी असमर्थन दाखविल्यामुळे केंद्रप्रमुख धुमाळ मॅडम यांना निलंबित करून अन्य ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी दिल्या होत्या. परिहारयांनी शिक्षकांना मानसिक त्रास दिला असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आहेत, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी सांगितले.

Web Title: Teachers commit suicide; Make an in-depth inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.