आळंदीतील ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:20+5:302021-09-08T04:14:20+5:30
प्रारंभी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गुळवे, सचिव वैष्णवी गुळवे व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत पूजन ...
प्रारंभी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गुळवे, सचिव वैष्णवी गुळवे व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेमधील शिक्षकांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले कौशल्य पणाला लावले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दलचे विचार व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिश सोलापुरे, द्वितीय क्रमांक आर्यन कांबळे यांनी मिळविला. इयत्ता पहिली व दुसरीतील वक्तृत्व स्पर्धेत सार्थक जाधव, वेदांत केंजळे या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे क्रमांक आला. तर इयत्ता तिसरी ते पाचवीतील निबंध स्पर्धेत मयूर ठोंबरे, आरोही बांगर, दीक्षा लांडगे या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा स्कूलचे मुख्याध्यापक विजय रामचंद्र गुळवे व उपमुख्याध्यापिका वैष्णवी विजय गुळवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया पाटील, नीता करसाळे, अनुजा वळसे, शुभांगी मांडके, प्रियांका बाबर, श्वेता बोडके, संचिता भुजाडी, प्रभाकर बोधने आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ : आळंदीतील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डाॅ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.