शिक्षकांची रिक्त पदे भरणार

By Admin | Published: July 14, 2016 12:46 AM2016-07-14T00:46:51+5:302016-07-14T00:46:51+5:30

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला

Teachers fill vacancies | शिक्षकांची रिक्त पदे भरणार

शिक्षकांची रिक्त पदे भरणार

googlenewsNext

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला असून, रिक्त पदांच्या ५० टक्के जागा भरण्याचे ठरविले आहे.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीत याबाबत चर्चा झाली असून, तसा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. यात सर्वसाधारण प्रवर्ग वगळता इतर गटातील पदे भरण्यात येणार आहेत. रोष्टर पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही पदे भरण्यास परवानगी द्या, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
बिंदूनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ‘शिक्षक द्या... शिक्षक.’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातून होत आहे. गेली तीन वर्षे जिल्ह्यात रोष्टरचे काम सुरू आहे. रोष्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन; तसेच भरती करता येत नाही. ज्या ठिकाणी एक किंवा दोन शिक्षकी शाळा आहेत, तेथील शिक्षक रजेवर गेल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात.
या विषयांवर जिल्हा परिषदेच्या अनेक बैठकांमध्ये यापूर्वी चर्चा झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी हा विषय चर्चेला घेतला. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. किती दिवस विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे, यावर सर्वजण ठाम होऊन रिक्त पदांच्या ५० टक्के शिक्षकभरती करण्याचे ठरविण्यात आले. यात जिल्ह्यात सर्वसाधारण गटातील शिक्षकांची पदे अतिरीक्त असल्याने तो प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.
साधारण ४७0 पदे भरली जाती असे शिक्षणाधिकारी मुश्ताग शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


1आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी, अशा ४५० शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत. हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा, अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोष्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात होते. त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीने २०१२ पर्यंत ज्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे २७१, तर सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त १५१ जणांचा समावेश आहे.

पटसख्या घटल्याने चिंता
पटसंख्या वाढविण्यासाठी आंम्ही वर्षभर आटोकाट प्रयत्न केले. तरीही यावर्षी जूनअखेरच्या आकडेवारीनुसार ती कमी झाल्याचे दिसत आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी पुढील काळात आणखी प्रयत्न केले जातील असे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले.

Web Title: Teachers fill vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.