शिक्षकच आपसात भिडले, परस्परविरोधी तक्रारी, अठरा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 06:07 AM2017-09-10T06:07:21+5:302017-09-10T06:07:26+5:30

अत्यंत किरकोळ कारणावरून शिक्षक दिनाच्या दुसºया दिवशी बुधवारी (दि. ६) जमाव जमवून दोन शिक्षकांनी हाणामारी करीत वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. कौठळी गावच्या हद्दीत चोरमले वस्ती येथील देवीच्या देवळाजवळ ही घटना घडली.

The teachers got into conflict, complaining against each other, contradicts, eighteen | शिक्षकच आपसात भिडले, परस्परविरोधी तक्रारी, अठरा जणांवर गुन्हा दाखल

शिक्षकच आपसात भिडले, परस्परविरोधी तक्रारी, अठरा जणांवर गुन्हा दाखल

Next

इंदापूर : अत्यंत किरकोळ कारणावरून शिक्षक दिनाच्या दुसºया दिवशी बुधवारी (दि. ६) जमाव जमवून दोन शिक्षकांनी हाणामारी करीत वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. कौठळी गावच्या हद्दीत चोरमले वस्ती येथील देवीच्या देवळाजवळ ही घटना घडली. परस्परविरोधी तक्रारी दाखल
झाल्या. एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन भरतराव राठोड (वय ३०, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, मूळ रा. केशवनगर, अंबाजोगाई रोड, लातूर ) व सहदेव नाथा काळेल (वय ३९, रा. काळेल वस्ती, कौठळी, ता. इंदापूर) या दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून त्या दोघांसह सुकुमार ऊर्फ सुकन्या नरळे, दत्तू नामदेव काळेल, राजेंद्र कारंडे, भारत काळेल, सुदाम नाथा काळेल, दुर्योधन सावकार काळेल, सतीश सावकार काळेल, विठ्ठल जीवराज काळेल, प्रकाश जीवराज काळेल, शिवाजी रामचंद्र नरळे, बाळू देविदास काळेल, रमेश देविदास काळेल, तानाजी रामचंद्र नरळे व अनोळखी तिघे जण (सर्व रा. काळेल वस्ती, कौठळी, ता. इंदापूर) आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन राठोड व संदेश काळेल हे दोन्ही शिक्षक एकाच शाळेत कार्यरत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसमोर हाणामारी
बुधवारी (दि. ६) सकाळी शाळेच्या वाटेवर या दोघांनी आपल्या सहकाºयांना बरोबर आणून एकमेकांशी हाणामारी केली, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ही घटना विद्यार्थ्यांसमोर घडली.

Web Title: The teachers got into conflict, complaining against each other, contradicts, eighteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.