शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक : राक्षे
By admin | Published: June 29, 2017 03:31 AM2017-06-29T03:31:14+5:302017-06-29T03:31:14+5:30
नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी व अप्रगत विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी व अप्रगत विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी नववीच्या मराठी, गणित, इंग्रजी, शास्र या विषयांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.
या जलद गतीने शिक्षण यासाठी याचा उपयोग होईल, असे मत उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केले.
राक्षे हे वाकी येथील पायस मेमोरियल स्कूलमध्ये नववीच्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. राक्षे म्हणाले, की शिक्षणाने मुलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. शिक्षकांनी मुलांना समजून घेऊनच शिकवावे. जलद गतीने शिक्षण या कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, बाळासाहेब राक्षे, समन्वयक दयानंद शिंदे, विलास जाधव व मार्गदर्शक म्हणून एस. एम. शिंदे, एस. व्ही. खंडागळे, पी. पी. सोनवणे, एस. डी. महाजन, एस. ए. कुंभार, पी. के. पवळे, एन. विभुते, एन. एल. तोत्रे तर मराठीचे ३०, गणिताचे ३५, शास्राचे ३५ , इंग्रजीचे ३५ शिक्षक उपस्थित होते.