वरवंड कोरोना सेंटरमध्ये शिक्षकांकडून रुग्णांची ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:06+5:302021-06-10T04:09:06+5:30

कोरोना पेशंटसाठी मनोरंजन, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, प्रार्थना, खेळ, गाण्यांच्या भेंड्या, वेशभूषा स्पर्धा या माध्यमातून त्यांनी कोरोना रुग्णांच्या जीवनामध्ये बदल ...

Teachers' Patient 'School' at Varvand Corona Center | वरवंड कोरोना सेंटरमध्ये शिक्षकांकडून रुग्णांची ‘शाळा’

वरवंड कोरोना सेंटरमध्ये शिक्षकांकडून रुग्णांची ‘शाळा’

Next

कोरोना पेशंटसाठी मनोरंजन, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, प्रार्थना, खेळ, गाण्यांच्या भेंड्या, वेशभूषा स्पर्धा या माध्यमातून त्यांनी कोरोना रुग्णांच्या जीवनामध्ये बदल घडवला आहे. फासगे यांनी या कोविड सेंटरमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेशंटसाठी वेळापत्रक बनवले आहे. त्यानुसार सेंटरचे नियोजन होत आहे. महिला, पुरुष, बालकांसाठी क्रिकेट ,लगोर, चल्लस आठ, गजगे, चमचा लिंबू, संगीतखुर्ची, आंधळी कोशिंबीर, रुमाल पाणी, पोत्यातल्या उड्या आदी खेळ घेत आहेत विजेत्या खेळाडूला बक्षीस दिले जात आहे.

या कोविड सेंटरमध्ये एक वाचनालय उभारले असून फावल्या वेळामध्ये कोरोणा रुग्ण पुस्तके वाचत आहेत. उल्लेखनीय म्हणजे कोरोना पेशंटना एकत्र करून वेशभूषा करुन वारीचा देखावा, पालखी दिंडी सोहळा, शिवराज्याभिषेक सोहळा , जागरण गोंधळ आदी चालू घडामोडीवरती आयोजित उपक्रम राबवले गेले आहेत. आतापर्यंत २५० पेशंट या कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी गेले आहेत.

--

Web Title: Teachers' Patient 'School' at Varvand Corona Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.