शिक्षकही संतापला!, सासवडच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:20 AM2017-10-25T01:20:28+5:302017-10-25T01:20:31+5:30

बारामती : नवीन बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षकांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सासवड येथे सभा पार पडली. या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला.

Teachers protested! Statement of statewide agitation in Saswad Sabha | शिक्षकही संतापला!, सासवडच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव

शिक्षकही संतापला!, सासवडच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव

Next

बारामती : नवीन बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षकांचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सासवड येथे सभा पार पडली. या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला. त्यामुळे अंगणवाडी, एसटी कर्मचाºयांपाठोपाठ आता शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यभर शिक्षक आंदोलनाचा भडका उडणार आहे.
नवीन बदलीधोरणाच्या अंमलबजावणीसाठी मागील सहा महिन्यांपासून ग्रामविकास विभाग अडून बसल्याने शिक्षक बदल्यांचा वाद चिघळला आहे. २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयामुळे बहुतांश शिक्षकांना विस्थापित व्हावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोयीच्या बदल्यांची भीती आहे.
बदलीधोरणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सभा सासवड येथील शिक्षक संघाच्या शंकरराव ऊरसळ सभागृहात झाली. या वेळी जिल्हाभरातून सर्व तालुका संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या बदली पोर्टलविषयी मोठ्या प्रमाणात संघटनेकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या. पारदर्शी कारभाराच्या नावाखाली राबविण्यात येत असलेल्या आॅनलाईन प्रक्रियेविषयी अनेक शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक बदलीपात्र नसलेल्याही शिक्षकांची नावे प्रशासकीय बदलीसाठी
दिसत आहेत.
बदली फॉर्म आॅनलाईन भरताना सर्व्हर डाऊन असणे, स्टाफ पोर्टलवरील ट्रान्सफर टॅब ओपन नसणे या मुळे शिक्षक त्रस्त आहेत. रात्रंदिवस साईट ‘ओपन’ होण्याची वाट बघण्याची वेळ शिक्षकांवर
आली आहे. जिल्हा संघाच्या सभेत बहुतांश तालुकाध्यक्षांनी तीव्र आंदोलनाची मागणी केली असल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला.
शासन गैरसोयीच्या बदल्यांसाठी विनाकारण अडून राहिले आहे. शिक्षकांचा आत्मसन्मान दुखावल्याने राज्यभर शिक्षक आंदोलनाचा वणवा पेटणार आहे, असे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.
>राज्यव्यापी आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरविण्यासाठी पुणे येथील शिक्षक संघाच्या शरद अध्यापक विद्यालयात आज
(दि. २५) बैठक होत आहे. संभाजीराव थोरात, बाळकृष्ण तांबारे यांच्यासह राज्यभरातील अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
यानिमित्त सर्व संघटनांना एकत्र आणण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: Teachers protested! Statement of statewide agitation in Saswad Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.