शिक्षणप्रमुखांना शिक्षकांचा पुन्हा घेराव

By admin | Published: November 14, 2014 11:54 PM2014-11-14T23:54:56+5:302014-11-14T23:54:56+5:30

रजा मुदतीतील शिक्षकांना शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेताना, महिला शिक्षकांची बदली लांब अंतरावरील शाळांमध्ये करण्यात आलेली आहे.

Teachers' recapture of teachers | शिक्षणप्रमुखांना शिक्षकांचा पुन्हा घेराव

शिक्षणप्रमुखांना शिक्षकांचा पुन्हा घेराव

Next
पुणो : रजा मुदतीतील शिक्षकांना शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेताना, महिला शिक्षकांची बदली लांब अंतरावरील शाळांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण मंडळ अध्यक्षांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरार्पयत हे आंदोलन सुरू होते. बदल्या करण्यात आलेल्या अनेक शिक्षिका बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी मंडळात आल्यानंतर, बदल्या रद्द करणो आपल्या हातात नसल्याचे सांगत शिक्षण प्रमुख  बबन दहिफळे यांनी महिलांची बोळवण केल्याने संतापलेल्या महिलांनी आंदोलनाचा पवित्र घेत, दहिफळे यांची गाडीच अडविली. त्यामुळे मंडळात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
शिक्षकांना दिलेल्या नियुक्तीपत्रमध्ये अनेक शिक्षकांच्या प्रामुख्याने महिला शिक्षकांच्या बदल्या करून त्यांना घरापासून लांबच्या शाळा देण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व बदली झालेले शिक्षक आज दुपारी मंडळात एकत्र आले. मात्र, त्यांची कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास दहिफळे मंडळात आले. या वेळी शिक्षकांनी त्यांना बदली रद्द करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी हे आपल्या हातात नसल्याचे सांगत ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी दहिफळे यांच्या गाडीसमोरच ठिय्या 
आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी केली. 
अखेर या प्रकरणी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी, शनिवारी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून बदल्या रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी माघार घेत दहिफळे यांच्या गाडीला रस्ता दिला. मात्र, या वेळी मंडळाकडून दिल्या जाणा:या त्रसामुळे अनेक शिक्षिकांना रडू कोसळले होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Teachers' recapture of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.