शिक्षकांची मार्चपास तिरंग्याला मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:11+5:302021-08-17T04:16:11+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मेजर जनरल ताजुद्दीन मौलाली म्हैसाळे, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ...

Teachers salute the tricolor on the march | शिक्षकांची मार्चपास तिरंग्याला मानवंदना

शिक्षकांची मार्चपास तिरंग्याला मानवंदना

Next

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मेजर जनरल ताजुद्दीन मौलाली म्हैसाळे, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विद्यापीठात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कुलसचिव डॉ. महेश चोपडे, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन आणि ट्रेनिंगचे (मॅनेट) प्राचार्य प्रा. सुबोध देवगावकर, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत पवार, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. राहुल मोरे, डॉ. आसावरी भावे, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, डॉ. रजनीश कौर सचदेव आदी उपस्थित होते. मेजर जनरल ताजुद्दीन मौलाली म्हैसाळे यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी विविध देशभक्तिपर गीत सादर केले.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, इनोव्हेशनमध्ये नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या प्रोत्साहन देण्याचे कार्य एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे केले जात आहे. इनोव्हेशनसाठी केंद्र सरकारने ३ कोटी रुपये दिले आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. भविष्यात नवे इनोव्हेटर तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

प्रा. नीलांबरी जाधव आणि प्रा. स्वप्निल शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राहुल मोरे यांनी आभार मानले.

फोटो - मार्चपास करताना विद्यापीठाचे प्राध्यापक.

Web Title: Teachers salute the tricolor on the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.