शिक्षक प्रशिक्षणासाठी गुणांकन पद्धत राबविणार
By admin | Published: June 10, 2017 02:13 AM2017-06-10T02:13:12+5:302017-06-10T02:13:12+5:30
शिक्षकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आता गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गुणांकनाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आता गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गुणांकनाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये केली जाईल.
राज्यातील शिक्षक प्रशिक्षणामध्ये बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणांची संपूर्ण जबाबदारी विद्या प्राधिकरणाकडे राहील. त्याचप्रमाणे या निर्णयानुसार आता विद्या प्राधिकरणाने मान्यता दिल्यावरच स्वयंसेवी संस्था शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकणार आहेत. गेल्या वर्षापासून शिक्षकांसाठी प्रशिक्षण ऐच्छिक ठेवण्यात आले. त्यामुळे काही शिक्षकांनी नियमितपणे
प्रशिक्षण कार्यक्रमांना हजेरी
लावली आहे, तर काही जण
त्याकडे फिरकलेलेच नाहीत.
त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणासाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब करून त्याची नोंद शिक्षकांच्या गोपनीय अहवालात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिक्षकांना देण्यात येणारे प्रशिक्षणांचा कितपत उपयोग झाला, याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांच्या विद्याार्थ्यांची संपादणूक पाहून प्रशिक्षणाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.