संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:12+5:302021-07-19T04:09:12+5:30

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे ...

Teaching of conduct, not recitation of saintly literature | संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

Next

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत ‘भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?’ या विषयावरील सत्रात. अभय टिळक बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्र.कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे ,डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.

डॉ. अभय टिळक म्हणाले, रोजच्या जीवनात संतांचे स्थान काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत संत साहित्यांचे प्रतिबिंबित होत नाही. रोजच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का? सर्वांनी हे पाहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य व बंधुभाव हे ख-या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.

डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या, संतांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची योग्य व्याख्या केली आहे. जीवनात याचा उपयोग कसा करावा हे शिकविले. पण काळाच्या ओघात हे सर्व विसरले आहे. सद्यस्थितीत मूल्य संवर्धनाची खूप गरज आहे. त्यासाठी संत साहित्याचा समावेश शिक्षणात प्रखरतेने करावे.

डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, चैतन्य महाराज देगलूरकर,वैभव डांगे म्हणाले, डॉ. ज्ञानेश लिमये, यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक, महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: Teaching of conduct, not recitation of saintly literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.