छेड काढणाऱ्याला धडा शिकवल्याने मुलीवर वार

By admin | Published: October 21, 2016 04:46 AM2016-10-21T04:46:32+5:302016-10-21T04:46:32+5:30

छेड काढल्याने भर चौकात चपलेने मारल्याच्या रागामधून दोन दिवसांनी एकाने मुलीवर कटरने वार केले. मंडई परिसरात एवढा गंभीर गुन्हा घडल्यावरही पोलिसांकडून मात्र गुप्तता

Teaching a lesson to the victim, the girl gets beaten | छेड काढणाऱ्याला धडा शिकवल्याने मुलीवर वार

छेड काढणाऱ्याला धडा शिकवल्याने मुलीवर वार

Next

पुणे : छेड काढल्याने भर चौकात चपलेने मारल्याच्या रागामधून दोन दिवसांनी एकाने मुलीवर कटरने वार केले. मंडई परिसरात एवढा गंभीर गुन्हा घडल्यावरही पोलिसांकडून मात्र गुप्तता पाळण्यात आली. माध्यमांना या घटनेची खबरही लागू न देणाऱ्या पोलिसांनी आरोपी ताब्यात येताच वाघ मारल्याचा आव आणत नंतर स्वत:ची पाठ थोपटवून घेतली.
पीडित मुलगी गोपाळ हायस्कूलमध्ये शिकते. मैत्रिणीसह ती सकाळी सातच्या सुमारास शाळेमध्ये जात होती. त्या वेळी देवदास भीमाप्पा मरटी या फिरस्त्याने पाठलाग करत त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. शिट्ट्या मारत, गाणी म्हणत त्यांची छेड काढली होती.
या मुलीने नंतर त्याचा पाठलाग सुरू केला. धैर्याने त्याला महात्मा फुले मंडईमध्ये गाठून चपलेने मार दिला होता. आरोपीने अपमानाचा बदला घेण्यासाठी पीडित मुलीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाळत ठेवली. बुधवारी सकाळी शाळेमध्ये जात असलेल्या मुलीवर पाठीमागून आलेल्या आरोपीने हल्ला केला. तिच्या पोटावर तसेच हातावर वार करून तो पसार झाला होता. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यातील आरोपीला शोधून काढले. त्याच्याकडून कटरही जप्त करण्यात आले आहे. परंतु, शाळेमध्ये जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढली जाते आणि ही मुलगी धैर्याने या आरोपीला चपलेने मारते. त्याच्या रागामधून तिच्यावर हल्ला करण्यात येतो.
राज्यात महिला-मुलींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढते आहे. पुण्यात गजबजलेल्या परिसरात मुलीवर हल्ल्याचा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी याची माहिती माध्यमांपासून लपवून ठेवली. आरोपी सापडताच याची माहिती जाहीर करून मिरविण्याचा प्रयत्न मात्र केला. (प्रतिनिधी)

Web Title: Teaching a lesson to the victim, the girl gets beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.